MRF Project Goa Dainik Gomantak
गोवा

MRF Project Goa: एमआरएफ सुविधेसाठी भाटी पंचायतीने निवडलेली जागा अभयारण्य बफर क्षेत्रात

Batim Panchayat: सुनावणी ११ रोजी; ॲमिकस क्युरी यांची हरकत, तपासणीचे निर्देश

दैनिक गोमन्तक

MRF Project Goa

पंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठी एमआरएफ सुविधा उभारण्यासंदर्भात भाटी व हळदोणे या दोन्हीच पंचायती उरल्या आहेत. हळदोणेने काम सुरू केले आहे, तर भाटी पंचायतीने एमआरएफ सुविधेसाठी निवडलेली जागा वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येत असल्याने त्याला ॲमिकस क्युरी नॉर्मा आल्वारिस यांनी हरकत घेतली. त्यामुळे या जागेची वन खात्यामार्फत तपासणी करण्याची तोंडी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने करत ही सुनावणी ११ मार्चला ठेवली आहे.

भाटी पंचायत ज्या ठिकाणी एमआरएफ सुविधा बांधत आहेत त्याच्या ना हरकत दाखल्यासंदर्भात प्रशासकीय लवादाकडे कोमुनिदादच्या निर्णयाला आव्हान दिले होते. लवादाने पंचायतीच्या बाजूने निर्णय दिला तरी त्याची अधिकृत प्रत मिळालेली नसल्याने ते बंद असलेले काम पुढे येत नाही. ही प्रत मिळताच काम सुरू केले जाईल, अशी माहिती पंचायतीच्या वकिलांनी आज खंडपीठाला दिली. खंडपीठानेही लवादाला ही निर्णयाची प्रत पंचायतीला लवकर देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, खंडपीठाने मागील सुनावणीवेळी भाटी पंचायतीने एमआरएफ सुविधा उभारण्याचे आश्‍वासन देताना ५ लाख रुपये जमा केले होते, खंडपीठाने गोठवले होते. सरपंच व सचिव या दोघांविरुद्ध अवमान प्रक्रिया का सुरू करू नये, अशी नोटीस बजावून त्यांना आज न्यायालयात उभे राहण्यास सांगितले होते त्यानुसार ते हजर झाले.

पंचायतीच्या वकिलांनी एमआरएफ सुविधेसाठी जागा ठरवण्यात आली असल्याचे सांगताच ही जागा वन्यजीव अभयारण्याच्या एक किलोमीटर बफर झोनमध्ये येत असल्याचे मत व्यक्त करून त्या परिसरात कोणतेच बांधकाम करण्यास बंदी आहे. त्यामुळे पंचायतीने पर्यायी जागा शोधावी वा सध्या उगे पंचायतीच्या एमआरएफ केंद्रात कचरा नेण्यात येतो, तो सुरू ठेवावा, असे मत ॲमिकस क्युरीनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT