SIT to Investigate Shivaji Maharaj Statue vandalism At Karaswada-Acoi Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! करासवाडा येथील शिवाजी महाराज पुतळ्याची विटंबना प्रकरणाचा तपास SIT करणार

उत्तर गोवा पोलीस अधिक्षकांनी स्वत: प्रकरणात लक्ष घालून त्याच्या पाठपुरावा करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

SIT to Investigate Shivaji Maharaj Statue vandalism At Karaswada-Acoi Mapusa Goa:  करासवाडा- आकय येथील येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर गोवा पोलीस अधिक्षकांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे अशा सूचना राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिल्या आहेत. उत्तर गोवा पोलीस अधिक्षकांनी स्वत: प्रकरणात लक्ष घालून त्याच्या पाठपुरावा करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले.

दरम्यान, पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

दरम्यान, त्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

SIT to Investigate Shivaji Maharaj Statue vandalism At Karaswada-Acoi Mapusa Goa

पुन्हा त्याच जागी स्थापन केला शिवरायांचा पुतळा

शिवप्रेमींनी याच ठिकाणी पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले. त्या प्रमाणे सायंकाळी आज शिवप्रेमींनी करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली.

आमदार कार्लुस फेरेरा आणि मंत्री सुभाष फळदेसाई हजर होते. दोघांनीही शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT