Goa Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : ‘मामलेदार’ राहुल देसाईचे कर्मचारी एसआयटीच्या रडारवर

राहुल देसाईला तीन दिवसांची कोठडी; आणखी दोघांना पुन्हा अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणी एसआयटीने बार्देशचा माजी मामलेदार राहुल देसाईला अटक झाल्याने त्याच्या निकटवर्तीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मामलेदार कार्यालयातील काही कर्मचारी एसआयटीच्या निशाण्यावर आहेत. राहुल याला म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा चालक असलेला संशयित योगेश वझरकर याला दुसऱ्यांदा तर मास्टरमाईंड संशयित राजकुमार मैथी याला चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे.

बनावट दस्तावेज तयार करून त्याच्या म्युटेशनसाठीची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी योगेश हा तत्कालिन मामलेदार संशयित देसाई याच्याकडे हे दस्तावेज सादर करत होता. त्यामुळे या दोघांचेही जमीन हडपप्रकरणातील मास्‍टरमाईंड असलेल्यांशी साटेलोटे व संबंंध असल्याचे एसआयटीला प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. अनेक वर्षे बार्देश मामलेदार असल्याने मामलेदार व चालक यांना हाताशी धरून जमिनी हडप केलेल्या मास्टरमाईंड असलेल्या मास्टरमाईंड असलेले राजकुमार मैथी, रॉयसन रॉड्रिग्ज, महम्मद सुहेल व सँड्रिक फर्नांडिस हे जमिनींची म्युटेशन प्रक्रिया करून घेत होते. या सर्व संशयितांच्या उत्पन्नस्रोताचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदविणार

एसआयटीकडील तक्रारींची संख्या दोनशेवर गेली आहे. एसआयटीने राहुल देसाई याच्याविरुद्ध दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. येत्या काही दिवसांत बार्देश मामलेदार कार्यालयात संशयित देसाई याच्याबरोबर काम केलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंदवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT