Colvale Land Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Land Scam : गोव्यात ‘एसआयटी’कडून आणखी तिघांना अटक

जमीन हडप प्रकरण : बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडांचे गैरव्यवहार

दैनिक गोमन्तक

Goa Land Scam : राज्यात गाजत असलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासकामाबरोबरच यामध्ये गुंतलेल्यांविरुद्धची कारवाई सुरूच ठेवल्याने याप्रकरणाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सामील असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. एसआयटीने आज मंगळवारी आणखी तिघांना अटक केली आहे.

मारियानो गोन्साल्विस व पालमिरा गोन्साल्विस (कुंक्कळी-सासष्टी) तसेच रॉनी रॉड्रिग्स, शिवोली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणातील अटक केलेले संशयित जामिनावर सुटत असल्याने काँग्रेसने एसआयटीच्या तपासकामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून सरकार याबाबत गंभीर नसल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणांचा तपास जलद गतीने होणे अपेक्षित असताना तो थंडावला आहे अशी टीका काँग्रेसकडून होत आहे.

एसआयटीचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार बार्देश मामलेदार कार्यालयातील झेवियर रोझारिओ परेरा यांनी तक्रार दाखल केली आहे. बामणवाडा-शिवोली येथील ब्रांका कासीयाना दिनिज, पावलिना ज्युलियाना दिनिज ऊर्फ पाल्मारिना गोन्साल्विस, मारियानो आंतोनिओ तेलीस गोन्साल्विस आणि रॉनी रॉड्रिग्ज या चौघांनी संगनमताने

बनावट कागदपत्रांच्या आधारे सत्तर वर्षांपूर्वीचे 1951 सालचे खरेदीपत्र (सेल डीड) व 6 ऑगस्ट 2021 ची सक्सेशन डीड तयार करून हणजूण येथील सर्वे क्रमांक 493/2 मध्ये म्युटेशनसाठी बार्देश मामलेदार कार्यालयात सादर करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी केलेल्या तपासकामात बनवेगिरी व फसवणूक झाल्याचे उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तपासाला गती

अशाप्रकारच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे येत असल्याने अखेर सरकारने एसआयटीची स्थापना करून विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. या पथकाने 18 जून रोजी विक्रांत शेट्टी याला घोगळ - मडगाव येथून अटक केल्यानंतर जमीन हडप प्रकरणाच्या तपासकामाला गती आली. आतापर्यंत अशा विविध प्रकरणात 13 जणांना अटक झाली असून 10 जण जामिनावर आहेत.

आतापर्यंत अटक झालेले संशयित

विक्रांत शेट्टी, मडगाव

महम्मद सुहेल शफी, सांतिनेज

धीरेश नाईक, बांदोडा

शिवानंद मडकईकर, फोंडा

सुनील कुमार, बंगळूर

अंजुम शेख, बंगळूर

अमृत गोवेकर, हणजूण

स्टिव्हन डसोझा, म्हापसा

मारियानो गोन्साल्विस, कुंकळ्ळी

पालमिरा गोन्साल्विस, कुंक्कळी

रॉनी रॉड्रिग्स, शिवोली, यांना आतापर्यंत अटक झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT