Siolim
Siolim  Dainik Gomantak
गोवा

Siolim News : मनोरुग्णाची करामत, तब्बल १२ तास वडाच्या झाडावर; शिवोलीतील प्रकार

गोमन्तक डिजिटल टीम

Siolim News :

म्हापसा शिवोली येथील कीर्ती विद्यालयाजवळील उंच वडाच्या झाडावर एक मनोरुग्ण चढला आणि तब्बल १२ तास शेंड्यावर बसून राहिल्याने पोलिस व अग्निशमन या प्रशासकीय यंत्रणेची बरीच तारांबळ उडाली.

सुरवातीला स्थानिक लोकांनी त्यास खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही निष्पन्न न झाल्याने प्रशासनाची मदत घेण्यात आली. मात्र, पोलिस व अग्निशमन दलाच्या सर्वतोपरी प्रयत्नानंतरही त्याने कुणाचे ऐकले नाही. पहाटे ६.३०च्या सुमारास बघ्याची गर्दी कमी होताच तो स्वतःहून खाली उतरला.

उपलब्ध माहितीनुसार, एक व्यक्ती उंच वडाच्या झाडावर चढून बसली आहे, ही बाब लक्षात येताच, स्थानिकांनी त्यास खाली उतरण्याची विनंती करीत त्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याने अग्निशमन दलास पाचारण केले.

त्यामुळे दलाचे अधिकारी घटनास्थळी पोचले, यावेळी शिडी झाडाच्या उंचीवर नेण्यात आली. परंतु, तो आणखीन वर चढू लागला. हे पाहून अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा हतबल झाले. हा मनोरुग्ण हिंदीत बोलत होता.

त्याने दलाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, लोकांना तिथून जाण्यास सांगा, मी खाली उतरतो. परंतु, लोक काही माघारी जात नसल्याने तो झाडावरून उतरण्याचे नाव काढेना. मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार सुरूच राहिला.

पोलिसांनी घेतले ताब्यात

रात्रीच्या वेळी तो उडी मारू नये म्हणून बराच वेळ दलाच्या साहाय्याने झाडाखाली जाळी धरुन उभे राहिले. तसेच बॅटरी टॉर्च मारुन ते इसमाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. शेवटी पहाटे हा मनोरुग्ण स्वतःहून खाली उतरला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याची वैद्यकीय तपासणीनंतर त्याला आयपीएचबीमध्ये भरती केले. या व्यक्तीचे नाव श्रीकांत (३५) असून तो अलाहाबाद, उत्तर प्रदेशमधील आहे. परंतु तो झाडावर का चढून बसला हे समजू शकले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT