Sanjay School Disabled Student Death in Goa Dainik Gomantak
गोवा

Accident Death : सिडनीचा मृतदेह भावाकडे सुपूर्द, नातेवाईकांचा प्रशासनावर रोष

Accident Death : आज हळदोणेत अंत्यसंस्कार : नातेवाईकांचा प्रशासनावर रोष

दैनिक गोमन्तक

Accident Death: दिव्यांग सिडनी डिसोझा (वय 40वर्षे) याचे मंगळवारी उपचारादरम्यान गोमेकॉत निधन झाले. शवचिकित्सेनंतर त्याचा मृतदेह भाऊ रिचर्ड डिसोझा यांच्याकडे सुपूर्द केला. सिडनीच्या पार्थिवावर हळदोणा येथे बुधवारी (ता.13) संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

सिडनीच्या मृत्यूस प्रशासन जबाबदार असून याप्रकरणी चाैकशी करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

30 ऑगस्ट रोजी पर्वरीतील इमारतीमधील लोखंडी रेलिंग्स जीर्ण झाल्याने ते मोडले आणि सिडनी खाली पडला.

ज्या इमारतीत ही घटना घडली तिथे संजय स्कूलचे दोन वर्ग, आधार कार्ड केंद्र, जनशिक्षण अभियान व समग्र शिक्षा अभियान ही कार्यालये सुरू असून दुसरा अपघात होण्याची सरकार वाट पाहते का? अशी प्रतिक्रिया एक पालक संजय नाईक यांनी व्यक्त केली.

गोमेकॉत हेळसांड : सिडनीच्या मामी रोझ सिक्वेरा म्हणाल्या, की आम्हाला गोमेकॉत प्रचंड त्रास झाला. सिडनीच्या ॲडमिशनवेळी आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जीएमसीमध्ये दाखल केल्यापासून दहा दिवसांत आपत्कालीन विभाग, आयसीयू, वाॅर्ड नं 111, 123 आणि व्हेंटिलेशन वारंवार बदलले. सिडनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार आहे.

शवचिकित्सा अहवालानंतर कारवाई

यासंदर्भात पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की पर्वरी पोलिस स्थानकात हा अपघात नोंद झाला आहे. शवचिकित्सेचा अहवाल मिळताच पुढील कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT