Crime News  Dainik Gomantak
गोवा

सिद्धी नाईक खून प्रकरणाला तीन वर्षे उलटली, तपास खोळंबला; कुटुंबीयांना न्याय मिळणार का?

Goa Crime: सिद्धी हिच्या मृत्युप्रकरणी आवाज उठवणारे काही ‘एनजीओ’ घटना विसरूनही गेले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सिद्धी नाईक खून प्रकरणाला आज तीन वर्षे होत आहेत. तपासाची फाईल सध्या क्राईम ब्रँचमध्ये धूळ खात पडली आहे. सिद्धी हिच्या मृत्युप्रकरणी आवाज उठवणारे काही ‘एनजीओ’ घटना विसरूनही गेले आहेत. तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

१२ ऑगस्ट २०२१ रोजी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर १९ वर्षीय सिद्धी नाईक या तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येऊन वाळूमध्ये किनाऱ्यावर सापडला होता. या घटनेने राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून हा तपास बंद करण्याचा प्रयत्न झाला होता.

मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तसेच काही एनजीओंनी याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर तसेच हे प्रकरण विधानसभेत गाजल्याने पुन्हा नव्याने तपास सुरू झाला होता. घटनेला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत, तरी तो अपूर्णच आहे. पोलिसांना यासंदर्भात आजतागायत पुरावे सापडले नसल्याने तपासाची फाईल धूळ खात पडून आहे.

कळंगुट पोलिसांनी सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणी ती घरातून बेपत्ता होती तेव्हापासून ती कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडली, तिथपर्यंतचे पुरावे मिळवण्याचे प्रयत्न केले. म्हापसा बसस्थानक येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही तिचा शोध घेण्यात आला; मात्र ठोस पुरावे हाती लागत नव्हते.

तिच्या घरातील सदस्यांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक तर्क - वितर्क काढण्यात आले होते. तिच्याकडे असणाऱ्या मोबाईलमधूनही पोलिसांनी पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अडीच महिने उलटून गेले तरी या प्रकरणात काहीच पुरावे मिळेनासे झाल्याने तसेच राज्यभरात या घटनेवरून सरकार तसेच पोलिसांवर होणाऱ्या टिकेमुळे हे प्रकरण २८ डिसेंबर २०२१ रोजी क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षकांकडे सोपवण्यात आला होता. शव चिकित्सा अहवालात सिद्धी नाईक हिचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने गुदमरून झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनाही या अहवालामुळे तपासाची दिशा मिळण्यास मुश्कील होत होते.

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आल्यानंतर अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याचा तपास सुरू करण्यात आला. कळंगुट पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासकामाचा दस्तावेज तसेच नव्याने क्राईम ब्रँचने नोंद केलेल्‍या एकूण ४० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

त्यामध्ये सिद्धी हिच्या घरातील कुटुंब सदस्य, सगेसोयरे, शेजारी तसेच तिच्याशी ओळख असलेल्यांचा त्यामध्ये समावेश होता. तिचा मृतदेह हा नेहमीच वर्दळ असलेल्या कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मिळाला होता. तसेच तिच्या अंगावरील दागिने गायब होते. कळंगुट येथे तिचा खून केला असण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या समुद्रकिनाऱ्यांवर तिची उपस्थिती तसेच, ज्या बसने ती गेली त्याची माहिती मिळवली.

मात्र, पोलिसांच्‍या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. हाती काहीच पुरावे लागत नसल्याने तपास अधिकाऱ्यांना कोणत्या दिशेने तपास करावा हे सुचत नव्हते. काही महिन्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू केली. या संदर्भातची माहिती सोशल मीडियावर येताच पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होऊन पुन्हा खळबळ उडाली.

सिद्धी नाईक मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास बंद करण्याचा पोलिसांचा इरादा नाही. या प्रकरणी तपास सुरूच आहे, असे सांगण्याची वेळ अखेर क्राईम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते. आता त्याला दोन वर्ष उलटत आहेत; मात्र या काळात किंचितही तपास पुढे गेलेला नाही. ही तपासाची फाईल सध्या क्राईम ब्रँचमध्ये धूळ खात पडली आहे. सिद्धी हिच्या मृत्युप्रकरणी राज्यात रान उठवणारे काही ‘एनजीओ’ही घटना विसरून गेले आहेत. तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार का, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT