Court  Dainik Gomantak
गोवा

दीपश्रीला 14 तर श्रुतीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; Cash For Job Scam प्रकरणात आणखी खुलासे होणार?

Shruti Prabhugaonkar and Deepshree Sawant Police Custody: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या श्रुती प्रभुगावकर आणि दीपश्री सावंत गावस यांना फोंडा कोर्टाने मोठा दणका दिला.

Manish Jadhav

फोंडा: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वादंग माजला आहे. रोज नव-नवे खुलासे होत आहेत. यातच आज (16 नोव्हेंबर) सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या श्रुती प्रभुगावकर आणि दीपश्री सावंत गावस या दोघींना फोंडा कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी कोर्टात पुन्हा एकदा अधिक चौकशीसाठी दोघींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. कोर्टानेही पोलिसांची मागणी मान्य केली. कोर्टाने श्रुतीला सहा तर दीपश्रीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पुढाऱ्यांसोबत श्रुतीची उठ-बस

दरम्यान, सावंत सरकारमधील मंत्री आणि बड्या पुढाऱ्यांसोबत असलेल्या जवळीकतेचा फायदा घेत श्रुतीने गोमंतकीयांची फसवणूक केली. तिची अनेक राजकारण्‍यांसोबत असलेली ऊठ-बस आणि मंत्र्यांच्‍या कार्यालयात बेधडक जाऊन तिथल्‍या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्‍याची कार्यशैली यांमुळेच गोमंतकीय तिला भुलले आणि त्यांनी आपली कष्‍टाची कमाई तिच्‍या घशात ओतली.

श्रुतीचे मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांशी असलेल्या कनेक्शनमुळे सावंत सरकार बॅकफूटवर आले आहे. विरोधकांनी सावंत सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. श्रुतीची चौकशी केल्यानंतर अनेक नवे खुलासे होतील असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, सावंत सरकारही विरोधकांच्या टीकेला जोरकसपणे उत्तर देत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यावी लागली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सरकार अजिबात सोडणार नाही.

दीपश्री सावंतला झटका!

दरम्यान, यापूर्वी दीपश्री सावंत गावस हिला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी आज (16 नोव्हेंबर) पुन्हा एकदा दीपश्रीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने पुन्हा एकदा तिच्या पोलिस कोठडीत वाढ केली. कोर्टाने तिला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी दीपाश्रीकडून तीन कार आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT