Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

केंद्रीय नोकऱ्यांबाबत स्थानिकांवर अन्याय

श्रीपादभाऊ कडाडले : अधिकाऱ्यांकडून ओळखीच्या तरुणांना संधी

दैनिक गोमन्तक

पणजी : शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून गोव्याच्या राजकारणात परिचित असलेले केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक गोव्यातील केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांबाबत आक्रमक झाले आहेत. या संस्थांमध्ये नोकरी देताना स्थानिकांवर अन्याय होत असून यापुढे गोमंतकीय तरुणांवर होणार अन्याय सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

राज्यात केंद्र सरकारशी संलग्न असणाऱ्या अनेक संस्था असून या संस्थांमध्ये नोकरी देताना वरिष्ठ अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना प्राधान्य देतात ते बहुतांश राज्याबाहेरील असतात. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे मत केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत ते आक्रमक झाले असून अशा संस्थांमध्ये नोकरी देताना स्थानिकांवर अन्याय न करता स्थानिकांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात, म्हणजे राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रामुख्याने पोस्ट आणि टेलिग्राम, गोवा शिपयार्ड, मोपा विमानतळ, आयुष रुग्णालय आणि शिक्षण संस्था या संस्थांचा समावेश असून या संस्थांमध्ये नोकरी देताना स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या राखीव

राज्यात आयुष मंत्रालयाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या आयुष रुग्णालय आणि शिक्षण संस्थेबरोबर मोपा येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात स्थानिकांसाठी 80 टक्के नोकऱ्या राखीव करण्यात आल्या आहेत. हे दोन्हीही करार करताना त्यांमध्ये या 80 टक्के राखीवतेची अट घालण्यात आली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून हे दोन्हीही प्रकल्प लवकरच सुरू होतील. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळेल, असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही; युवा क्रीडापटूंना संधी देण्यावर भर

Gorvancho Padwo: शेणाचे गोठे, कारिटांच्या गायी; 'गोरवांचो पाडवो' साजरा करण्याची गोव्याची अनोखी

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठा अपघात टळला; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

World Cup 2025: भारतीय महिला संघासाठी अस्तित्वाची लढाई; गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाचा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी काय आहे समीकरण?

अग्रलेख: 40 वर्षांपूर्वी लावलेली रवि नाईकांच्या भूस्वाभिमानाची ज्योत आजही तेवत

SCROLL FOR NEXT