Sabudana for Shravan 2022 Dainik Gomantak
गोवा

Shravan 2022 : उपवासासाठी लागणारा साबुदाणा महागला

उत्पादनातील घट : श्रावणामुळे मागणी वाढली, 55 ते 60 रुपये किलोने विक्री

दैनिक गोमन्तक

पणजी : श्रावण महिना सुरू होताच उपवासांसाठी लागणाऱ्या वस्‍तूंच्‍या दरात वाढ झाली आहे. यात खिचडीसाठी लागणारा साबुदाण्याचाही समावेश आहे. साबूदाणा उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्‍याने यंदा लागवडीत घट झाली. यामुळे उत्पादन 20 टक्‍क्‍यांनी कमी झाल्‍याने आवकही घटली असल्‍याचे येथील पणजी मार्केटमधील व्‍यापाऱ्याने सांगितले.

गेल्‍या आठवड्याच्‍या तुलनेत साबुदाण्याचे दर सरासरी दहा रुपयांनी वाढले आहेत. उत्तम दर्जाचा साबुदाणा 60 ते 65 रुपयांस तर मध्यम दर्जाचा साबूदाणा 55 ते 60 रुपयांनी विकला जात आहे. तमिळनाडूतील सेलम परिसरात साबूदाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन केले जाते. तीन वर्षांपासून साबुदाण्याच्या उत्पादकांना मिळणाऱ्या दरात वाढ झालेली नाही. यामुळे उत्‍पादकांनी साबूदाणा कंदाची लागवड कमी केली. तसेच गेल्‍या हंगामात साबुदाणा कंदांचे उत्पादन कमी झाले होते.

नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. यानंतर येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्रींमुळे साबूदाण्याची मागणी वाढणार आहे. घाऊक बाजारात मध्यम प्रतीचा साबूदाणा साडेचार ते पाच हजार प्रति क्विंटल होता. तो साडेपाच ते सहा हजारांवर गेला आहे. उच्चा दर्जाचा साबुदाणा 5000 ते 5500 रुपये होता, तो आता 6000 ते 6500 रुपयांवर गेला आहे. यात जीएसटीचा विचार करता किरकोळ खरेदी करताना ग्राहकांना दर्जानुसार 55 ते 65 रुपये मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्र किंवा उत्तर भारतातील राज्‍यांचा विचार करता आपल्‍याकडे साबूदाणा खाण्याचे प्रमाण तुलनात्‍कदृष्ट्या कमी आहे. मात्र या राज्‍यांतील गोव्‍यात स्‍थायिक झालेले लोक साबूदाण्यास प्राधान्‍य देतात. तमिळनाडूतील सेलम जिल्हा आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागात साबुदाणा कंदाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी, साबूदाणा वडा, खीर आदी पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. यामुळे साबुदाण्यासह उपवासाच्या सर्वच पदार्थाच्या दरात तेजी राहील, अशी माहिती या व्‍यापाऱ्याने दिली.

गेल्‍या काही महिन्‍यांपासून जीवनावश्‍यक वस्‍तूंच्‍या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र सरकारने आता स्‍वयंपाक घरात लागणाऱ्या पदार्थांवरही जीएसटी लागू करून सर्वसामान्‍यांचे कंबरडे मोडले आहे. त्‍यातच श्रावण महिना सुरू होताच शेंगदाणे, साबुदाणा, राजगिरा यांचे दर वाढले आहेत. श्रावण संपताच नवरात्री, दिवाळी या काळातही उपवसांचे प्रमाण अधिक असते. अशावेळी दरांमध्ये वाढ करून दलाल आपला फायदा करून घेत असतात. यावर सरकारने नियंत्रण ठेवावे, अशी प्रतिक्रिया येथे खरेदीसाठी आलेल्‍या रेश्‍मा नाईक या गृहिणीने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT