Jayesh Salgaonkar Dainik Gomantak
गोवा

गोवा फॉरवर्डकडून जयेश साळगावकरांना कारणे दाखवा नोटीस

भाजपचे महामंत्री सतीश धोंड (Satish Dhond) यांच्याशी साळगावकर यांची या दिवसात घसट वाढल्याचे दिसून आल्याचे या नोटीसीत म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) साळगावचे आमदार जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांचा भाजप नेत्यांशी असलेले संबंध उघड झाले असून या पार्श्वभूमीवर आज गोवा फॉरवर्ड पक्षाने त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. 24 तासात या नोटीसीला उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपचे महामंत्री सतीश धोंड (Satish Dhond) यांच्याशी साळगावकर यांची या दिवसात घसट वाढल्याचे दिसून आल्याचे या नोटीसीत म्हटले आहे.

दोन दिवस आधी गोवा फॉरवर्डच्या आमदारांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर जयेश साळगावकर नव्हते. त्यावेळी भाजपच्या एका आमदाराने गोवा फॉरवर्ड बरोबर दिल्लीत नसलेला आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असे म्हटले होते. त्याचवेळी जयेश साळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले होते. आज जारी केलेल्या नोटीसीत गोवा फॉरवर्डने याही घटनेचा उल्लेख करत या संबंधी साळगावकर यांनी कुठलाही खुलासा केलेला नाही याकडे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT