Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire : म्हापसा करासवाडा येथे दुकान आगीत जळून खाक

आगीत हजारो रुपयांचं सामान जळून खाक झालं असून जवळपास 70 हजारांचं सामान वाचवण्यात यश आलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात मागील काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी रात्री उशिरा म्हापसा करासवाडा येथे एका दुकानाला आग लागून ते जळून खाक झालं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

म्हापसा करासवाडा येथे सोमवारी रात्री अचानक एका दुकानाला आग लागली. भरवस्तीत असलेल्या दुकानाला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या आगीची माहिती तातडीने म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत लगेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झालं होतं.

दिनेश हरमलकर यांच्या मालकीचं हे दुकान असल्याची माहिती असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे. आगीत हजारो रुपयांचं सामान जळून खाक झालं असून जवळपास 70 हजारांचं सामान वाचवण्यात यश आलं आहे.

दुसरीकडे मागच्याच आठवड्यात कोलवाळमध्ये आग लागून चार भंगारअड्डे जळून पूर्णतः खाक झाले होते. हे चारही दुर्घटनाग्रस्त अड्डे 8 हजार चौ.मी. जागेत पसरल्याने जवानांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला होता.

मूशीरवाडा येथे भंगारअड्ड्यांना लागलेल्या आगीवर गोवा अग्निशमन दलाने दोन दिवसांनंतर नियंत्रण मिळविले. ही आग विझविण्यासाठी 3.5 लाख लिटरहून अधिक पाण्याचा वापर केल्याची माहिती गोवा अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांनी घटनास्थळी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT