Arrest Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: 'मुली नाही मुले आवडतात' म्हणत, शिक्षकाने अल्पवयीन मुलाला पाठवला अश्लील व्हिडिओ

Goa Crime News: पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.

Pramod Yadav

फोंडा: येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर संशयित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवला. मुलाला संबधित व्हिडिओ पालकांना दाखवल्यानंतर पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.

संशयिताची चौकशी केली असता त्याने त्याला मुली नाही तर मुले आवडातात असे सांगितले. तसेच, असे (अश्लील) बोलणे, मेसेज पाठवणे त्याला आवडते असेही त्याने पोलिसांना सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे हा संशयित व्यक्ती खासगी शिकवणी घेतो, असे तपासात उघडकीस आले आहे.

दरम्यान, संशयित व्यक्ती आणि मुलाची ओळख देखील नसल्याचे तपासात समोर आले आहे. मुलाच्या पालकांनी याप्रकरणी संशयिताविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी देखील मुलाच्या पालकांनी केली आहे. भविष्यात काही चुकीची घटना घडू नये म्हणून योग्य खबरदारी घ्यावी, असेही मुलाच्या पालकाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

SCROLL FOR NEXT