Dogs Death Dainik Gomantak
गोवा

नेपाळी नागरिकाचा गोव्यात संतापजनक प्रकार; दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन केले ठार

Goa Crime News: नेपाळी नागरिकांने गोव्यात दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन अमानुषपणे ठार केले आहे.

Pramod Yadav

पर्वरी: नेपाळी नागरिकाने गोव्यात संतापजनक प्रकार केला आहे. दोन पाळीव कुत्र्यांना विष देऊन ठार करण्याचे अमानुष कृत्य त्याने केले आहे. हाळीवाडा - पर्वरी येथे हा व्यक्ती केअरटेकर म्हणून काम करत होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खीम बाहदूर पून (रा. हाळीवाडा - पर्वरी, मूळ नेपाळ) असे या संशयित केअरटेकरचे नाव आहे. त्याने केलेल्या क्रूर प्रकारावरुन पर्वरी पोलिसांकडून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पर्वरीतील रो हाऊसमध्ये तो केअरटेकर म्हणून काम करत होता.

रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह

वास्को – दाबोळी रेल्वे ट्रकवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शरण पिरांगी (वय ४७, रा. कर्नाटक) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला का? काही इतर कारणांमुळे याचा तपास केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली

राय येथे महिलेच्या गळ्यातून सोन्याची सैन हिसकावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बिट्स पिलानीमध्ये पाच नव्हे सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, युरी आलेमाव यांचा दावा; आकाश गुप्ताचा मृत्यू का लपवला?

All-Time Asian T20 squad: ऑल टाईम टी-20 आशिया संघ जाहीर, रोहित-विराटसह 5 भारतीय खेळाडूंचा समावेश; बाबरला वगळंल

मनसेने सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या MRF च्या नोकर भरतीवरुन गोव्यात वाद का झाला? Explained

Goa Live Updates: 8 फूट अजगराला पकडून सुरक्षित जंगलात सोडले; काणकोणातील लोलिये येथील घटना

Nepal Violence: पशुपतिनाथाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भारतीयांच्या बसवर हिंसक जमावाचा हल्ला! मारहाण करुन लुटले सामान; अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT