Police  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! गोव्याच्या महिलेची पुण्यातील पोलिस चौकीत आत्महत्या; अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा संशय

महिलेविषयी गुढ कायम; गोव्यातील खासगी कंपनीत काम करत होती

Akshay Nirmale

Goan Woman Hanged herself in Police Custody: गोव्यातील एका 29 वर्षीय महिलेने महाराष्ट्रातील पोलिस चौकीत गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या ओटास्किम चौकीत सोमवारी (ता. 17) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 14 वर्षीय मुलगी गोवा येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी गोव्यातील एका 29 वर्षीय महिलेशी या अल्पवयीन मुलीची ओळख झाली. काही काळाने संबंधित अल्पवयीन मुलगी निगडी येथे परत आली.

काही काळाने गोव्याची महिला निगडीत आली आणि संबंधित अल्पवयीन मुलीला घेऊन ती 12 एप्रिल रोजी कुणालाही कल्पना न देता निघून गेली.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनाही माहिती नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. निगडी पोलिस ठाण्यात 12 एप्रिल 2023 रोजी अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला.

पुण्यातून ही गोमंतकीय महिला आणि अल्पवयीन मुलगी प्रथम जळगावला गेल्या. त्यानंतर तिथून इकडे तिकडे फिरत त्या अहमदनगरला पोहचल्या.

त्यानंतर अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाईनला एका महिलेसोबत एक अल्पवयीन मुलगी असून त्यांचा वावर संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी संबंधित महिला आणि मुलीला ताब्यात घेत चौकशी केली.

मुलीकडून तिच्या वडीलांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मुलीचे वडील आणि निगडी पोलिस अहमदनगर येथे गेले. तेथून अल्पवयीन मुलीला व महिलेला ताब्यात घेऊन निगडी पोलिस ठाण्यात आणले गेले.

अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवडिलांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी ओटास्किम पोलिस चौकीत नेण्यात आले.

गोव्याच्या महिलेचा जबाब नोंदवून घेत असताना वॉशरूम वापरू देण्याची विनंती केली. खूप वेळ झाला तरी ती स्वच्छतागृहातून बाहेर न आल्याने पोलिसांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला. तेव्हा महिलेने स्वच्छतागृहातील लोखंडी अँगलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

ही महिला गोव्यातील एका खासगी कंपनी काम करत होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT