Mumbai-Goa Highway Shivshahi Bus Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस उलटली; अपघातात 1 ठार, 25 जखमी

चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway Shivshahi Accident: मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर 25 जण जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी बसचालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल येथील कर्नाळ्याजवळ मंगळवारी मंगळवारी दुपारी 3.50 च्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते. अपघातात 25 जण जखमी झाले.

सर्व जखमींना पनवेलच्या जिल्हा रूग्णालयात, एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दिप्तेश मोरेश्वर टेमकर (31) असे त्याचे नाव आहे.

ही शिवशाही बस पनवेल आगारातून महाडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस उतारावरून जात असताना चालकाने वेग कमी केला नाही. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकावर जाऊन आदळली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT