Tree Collapses  Dainik Gomantak
गोवा

Goa monsoon 2023: शिकवणीसाठी विद्यार्थी आले अन् घरावर झाड पडले; शिवोलीतील घटना

अग्निशमनने झाड हटवून मुलांची केली सुटका

गोमन्तक डिजिटल टीम

Tree Collapses : मार्ना-शिवोली येथे सोमवारी संध्याकाळी सरीता च्यारी यांच्या कौलारू घरावर भलेमोठे आंब्याचे झाड वादळी वाऱ्याने कोसळल्याने घरात शिकवणीसाठी आलेले चार विद्यार्थी अंगावर कौले पडल्याने जबर जखमी झाले.

दरम्यान, ही मुले अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड हटवेपर्यंत घरातच अडकून पडली होती.जखमींवर स्थानिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी तसेच पालकांत भीतीचे वातावरण पसरले.

दरम्यान, संध्याकाळी उशिरा घडलेल्या या घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलाला स्थानिक प्रभागाचे पंच सदस्य विल्यम फर्नांडिस यांनी तात्काळ दिल्याने पंधरा मिनिटांत दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घरावर पडलेले आंब्याचे झाड यंत्राने कापून बाजूला केले व घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केली.

सरीता च्यारी यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याची माहिती मिळताच तत्काळ म्हापसा अग्निशमन दलाला माहिती दिली व जवानांनी तत्काळ घटनास्थळी येऊन मदतकार्य केले. घरात जवळपासचे शालेय विद्यार्थी शिकवणीसाठी येत होते. त्यापैकी एक-दोन विद्यार्थी डोक्यावर कौले पडल्याने जखमी झाले. परंतु त्यांच्यावर तत्काळ उपचार करून घरी पाठवण्यात आले.

विल्यम फर्नांडिस (स्थानिक पंच सदस्य)

माझी सहा वर्षांची मुलगी सरीता च्यारी यांच्याकडे ट्युशनसाठी जाते. या घटनेत पाठीवर कौले पडल्याने ती किरकोळ जखमी झाली. शिवोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठवले आहे. तथापि, घोलान -शिवोली येथील अन्य एक विद्यार्थिनी या घटनेत जबर जखमी झाल्याचे ऐकून वाईट वाटले.

लवू धारगळकर (पालक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT