Fr Bolmax Pereira   Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, फादर बोलमॅक्स यांना न्यायलयाचा मोठा दिलासा

बोलमॅक्स यांनी अटक टाळण्यासाठी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

Pramod Yadav

Fr Bolmax Pereira: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिस्ती धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बोलमॅक्स यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवप्रेमींनी ठिय्या आंदोलन केले होते.

बोलमॅक्स यांनी अटक टाळण्यासाठी मडगाव न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने परेरा यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.

फादर बोलमॅक्स परेरा यांच्या विरोधात कलम 295 आणि 504 अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोलमॅक्स यांचे वक्तव्य सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी फादर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली.

शुक्रवारी रात्री वास्को पोलीस ठाण्यासमोर निदर्शेने केली. त्यानंतर रात्री उशीरा फादर परेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी बोलमॅक्स यांनी जामीनासाठी अर्ज केला.

दरम्यान, न्यायालयाकडून परेरा यांना दिलासा मिळाला आहे. परेरा यांना बाँड व हमीदाराच्या अटीशर्तीवर मडगाव सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

फादर परेरा यांनी मागितली होती माफी

फादर बोलमॅक्स परेरा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर, परेरा यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली होती. तसेच, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. असेही त्यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT