Shivaji Maharaj Statue vandalised at Karaswada-Acoi Mapusa Dainik Gomantak
गोवा

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना! आमदार विजय सरदेसाईंची गोवा सरकार आणि पोलिसांवर जहरी टीका

फादर बोलमॅक्स यांनी केलेल्या वक्तव्यानंतर झालेला वाद शांत होत असतानाच आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे.

Pramod Yadav

Shivaji Maharaj Statue vandalised at Karaswada-Acoi Mapusa: म्हापशातील करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी पुतळ्याची विटंबना केल्याचा स्थानिकांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

फादर बोलमॅक्स यांनी केलेल्या वक्तव्यानंतर झालेला वाद शांत होत असतानाच आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी या घटनेवरून गोवा सरकार आणि पोलीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

"गोवा भाजप सरकार कोणाचेही संरक्षण करण्यास सक्षम नाही. गोवा सरकार केवळ गोमन्तकीयांचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राष्ट्रीय वीरांचे रक्षण करण्यासही अपुरे ठरले आहेत. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो; मी गोवा सरकार आणि गोवा पोलिसांचा निषेध करतो!"

"जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याचे मूलभूत कर्तव्य पार पाडण्यात दोघेही सपशेल अपयशी ठरले आहेत. गोव्यातील जनतेचा अकार्यक्षम पोलिसांवर किंवा मणका नसलेल्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही."

"मी या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करतो. सर्व गोमन्तकीयांनी शांतता राखावी अशी विनंती करतो. असे ट्विट आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे."

करासवाडा-आकोई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मोडतोडीचा प्रकार समोर आल्यानंतर म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकारामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही पण दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुतळा या ठिकाणी बसवताना काही काहींनी आम्हाला विरोध केला होता. असेही येथील स्थानिकांनी यावेळी सांगितले. प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना नियोजित असून, राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT