Karaswada-Acoi Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

त्याच जागी, आजच होणार शिवरायांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना; आमदार कार्लुस फेरेरा लावणार हजेरी, पोलिसांना अल्टिमेटम

हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Pramod Yadav

Karaswada-Acoi Mapusa Goa: म्हापशातील करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा राज्यातील शिवप्रेमींकडून निषेध केला जात आहे.

घटनास्थळी म्हापसा पोलीस दाखल झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, शिवप्रेमींनी त्याच त्याच जागी आजच शिवरायांचा पुतळा उभाणार असल्याचे जाहीर केले आहे. आज (सोमवार) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान पुतळ्याची पुनर्स्थापना असे एका शिवप्रेमींनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.

हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. फेरेरा यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तसेच याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आज सायंकाळी बसविण्यात येईल मी स्वत: या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. असे आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

तसेच, शिवरायांचा पुतळा स्थलांतरीत करण्यासाठी IDC कडे जागेची मागणी करणार असल्याचेही फेरेरा म्हणाले. शिवराय राष्ट्रीय वीर आहेत आणि आपण त्यांचा मान राखयला हवा असेही फेरेरा यावेळी म्हणाले.

खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. ही घटना देशाच्या एकतेवर आघात असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

कारवाईसाठी पोलिसांना सात दिवसांचा अल्टिमेटम

पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी आमदार विजय सरदेसाई यांनी देखील या घटनेचा निषेध करत गोवा पोलीस आणि भाजप सरकारवर टीका केली. सरकार समान्य गोमन्तकीयांची आणि छत्रपती शिवराय यांच्यासारख्या राष्ट्रीय वीरांचे संरक्षण करण्यासही असमर्थ ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT