Shivaji Maharaj Statue Reinstalled At Karaswada-Acoi Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराज की... पुन्हा त्याच जागी स्थापन केला शिवरायांचा पुतळा, फेरेरांनी केला अभिषेक

दरम्यान शिवप्रेमींनी याच ठिकाणी पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले.

Pramod Yadav

Shivaji Maharaj Statue Reinstalled At Karaswada-Acoi Mapusa Goa: करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली. रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले.

दरम्यान शिवप्रेमींनी याच ठिकाणी पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जाहीर केले. त्या प्रमाणे सायंकाळी आज शिवप्रेमींनी करासवाडा-आकय येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली.

यावेळी आमदार कार्लुस फेरेरा आणि मंत्री सुभाष फळदेसाई हजर होते. दोघांनीही शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला.

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर शिवप्रेमी चांगलेच संतप्त झाले. याचजागी शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याप्रमाणे शिवप्रेमींनी सायंकाळी मंत्री फळदेसाई आणि आमदार कार्लुस फेरेरा यांच्या उपस्थित पुतळ्याची स्थापना केली. दोघांनीही शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक केला. यावेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. ही घटना देशाच्या एकतेवर आघात असल्याचे नाईक यांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT