Margaon Dainik Gomantak
गोवा

Margaon: मडगावातील जुन्‍या धोकादायक इमारतींवर त्‍वरित कारवाई करा, राजू विर्डीकर यांचे जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन

मडगावातील कित्‍येक जुन्‍या इमारती पाच वर्षांपूर्वी धोकादायक म्‍हणून जाहीर केल्‍या होत्‍या. मात्र, मागच्‍या पाच वर्षांत या इमारतींवर मडगाव पालिकेने कुठलीही कारवाई केली नाही.

Sameer Amunekar

मडगाव: मडगावातील कित्‍येक जुन्‍या इमारती पाच वर्षांपूर्वी धोकादायक म्‍हणून जाहीर केल्‍या होत्‍या. मात्र, मागच्‍या पाच वर्षांत या इमारतींवर मडगाव पालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. या जुन्‍या इमारती लोकांसाठी धोकादायक बनल्‍या असून त्‍या हटविल्‍या नाहीत, तर निष्‍पाप जनतेचा जीव धोक्‍यात येऊ शकतो. अशा आशयाचे निवेदन शिवसेेनेचे शाखा विस्‍तार प्रमुख राजू विर्डीकर यांनी दक्षिण गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांना दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपळकट्ट्याजवळील जीर्ण इमारतींचा सज्‍जा कोसळून तीन वाहनांचे नुकसान झाले होते. त्‍यानंतर दुसऱ्याच दिवशी सिनेलता जवळ असलेल्‍या आणखी एका इमारतीची अशीच अवस्था झाली होती.

यापूर्वीही मडगावातील अशा जुन्‍या इमारतींचे भाग कोसळण्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत याकडे लक्ष वेधून या इमारतींच्‍या पडझडीत सापडून कुणी मृत्‍यूमुखी पडण्‍यापूर्वीच याेग्‍य ती कारवाई करा अशी मागणी विर्डीकर यांनी या निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्‍या प्रती पालिका मुख्‍याधिकारी तसेच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना देण्‍यात आल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT