Shiv sena leader Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

'गोव्याला लुटण्यासाठी दिल्ली व पश्‍चिम बंगालमधील पक्ष गोव्यात'

संजय राऊत यांनी घेतले म्हापसातील बोडगेश्‍वराचे दर्शन

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा-महाराष्ट्राचे (Goa- Maharashtra) नाते युगाचे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (ShivSena) गोव्याच्या (Goa) मातीशी नातं आहे. गोव्याला लुटण्यासाठी दिल्ली व पश्‍चिम बंगालमधील (West Bengal) पक्ष गोव्यात येत आहेत. गोव्याच्या जनतेने लुटारू पक्षापासून सावध राहिले पाहिजे, असे विधान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हापसा (Mapusa)  येथे पत्रकाराशी बोलताना केले.

काल दुपारी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देव बोडगेश्‍वराचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस, राखी नाईक , ऐश्‍वर्या साळगावकर, श्रीकांत सीमेपुरुषकर, राजेश मराठे, झायगल लोबो, मंदार पार्सेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी देव बोडगेश्‍वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईटकर यांनी खासदार संजय राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

आजपर्यंत गोव्यात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये शिवसेना युती किंवा आघाडीमध्ये सहभागी झाली होती. आम्हाला 3 ते 4 जागा प्रत्येकवेळी मिळाल्या ज्या मतदारसंघात शिवसेनेचे कार्य नाही त्या जागा आमच्या वाट्याला आल्यामुळे आमच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती. मगोप हा या मातीतला पक्ष आहे. या पक्षाबरोबर आम्ही मागच्या अनेक वर्षांपूर्वी युती केली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे या बोडगेश्‍वर मैदानावर सभेसाठी आले होते. त्यावेळी आमचा उमेदवार काही मतांनी पराभूत झाला होता.

आम्ही येणाऱ्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 22 ते 25 जागा लढविणार आहोत. पक्षाची ताकद आम्ही दाखवू. विद्यमान भाजपा सरकार अपयशी सरकार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने गोव्याची ओळख अमली पदार्थ, कॅसिनो, वेश्‍या व्यवसाय अशी केली आहे. नियोजनाअभावी कोरोनामुळे हजारो अनेकांचे बळी गेले. शिवसेनेने कोरानाच्या काळात उत्तम कार्य केले आहे. गोव्यातील अनेक रुग्णांना मुंबईसह अनेक राज्यामध्ये उपचारासाठी नेले होते, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राजकारण हे चंचल

राजकारण हे चंचल आहे. कुठल्याही वेळी कुठलीही घटना राजकारणात घडू शकते. काल केलेले भाष्य उद्या असणार आहे की  नाही, हे राजकारणात कुठलाच राजकीय पुढारी सांगू शकत नाही. मागच्या वेळी आपण महागठबंधन करणार असे विधान केले होते. काल आपण स्‍वबळावर निवडणूक लढविणार, असे संकेत दिल्यामुळे भाजपाला याची पूर्ण कल्पना आहे. चंचल राजकारणात असे घडत राहणार, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT