Crime News Goa Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime: प्रेयसी प्रतारणा करते, शंकेने केला खुनी हल्ला; गोव्यातून गाठली रत्नागिरी, संशयिताला सांगलीतून घेतले ताब्यात

Shirwai Quepem Crime: प्रेयसी साक्षी हिच्‍यावर खूनी हल्‍ला केल्यानंतर गोव्‍यातून पळून गेलेला संशयित अजय कदम हा तब्‍बल चार दिवस वेड्यासारखा महाराष्‍ट्रात भटकत होता.

Sameer Panditrao

मडगाव: प्रेयसी साक्षी हिच्‍यावर खूनी हल्‍ला केल्यानंतर गोव्‍यातून पळून गेलेला संशयित अजय कदम हा तब्‍बल चार दिवस वेड्यासारखा महाराष्‍ट्रात भटकत होता. शेवटी सांगली येथे एका लॉजवर असताना गुरुवारी केपे पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले.

या संशयिताला केपे न्‍यायालयासमोर हजर केले असता, सहा दिवसांच्‍या पोलीस कोठडीचा रिमांड देण्‍यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ निर्माण झाली होती.

प्रेयसी आपली प्रतारणा करते आणि ती दुसऱ्याबराेबर संबंध ठेवून आहे, या शंकेने संशयिताला ग्रासले होते. त्‍यातूनच त्‍याने हा हल्‍ला केल्‍याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, चार वर्षे संशयित आणि साक्षी यांच्यात संबंध होते.

संशयित अजय हा मडगावला राहत होता. प्रेयसीला घेऊन तो कित्‍येकदा जांबावलीच्‍या देवळातही गेला होता. मात्र काही महिन्‍यांपूर्वी या दोघांत फुट पडली होती. १२ मे रोजी साक्षी मैत्रिणीसह जांबावलीला जाण्‍यासाठी बाहेर पडली होती. शिरवई येथे ती त्‍याला सापडली. त्‍याचवेळी त्‍याने तिच्‍यावर हल्‍ला केला आणि इस्पितळात दाखल करुन पळही काढला होता.

रत्नागिरीनंतर गाठली सांगली...

अजय याने बसने प्रवास करीत आधी रत्‍नागिरीतील गुहागर गाठले. तिथे त्‍याचे नातेवाईक राहत असल्याने जेवण करुन तो तिथून बाहेर पडला. त्‍यानंतर त्‍याने सांगली गाठली. अजय हा रत्‍नागिरीच्‍या बाजूने निघाला असल्याची माहिती मिळाल्‍यावर केपेचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्‍या नेतृत्‍वाखाली पोलीस शिपाई प्रणय नाईक, सूरज नाईक व देविदास वरक यांचे पथक महाराष्‍ट्रात पाठविण्‍यात आले. या पथकाला संशयिताचे ‘लोकेशन’ सांगली येथे सापडल्‍यानंतर त्‍याला तेथून ताब्‍यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT