Shiroda  Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : कामाक्षी देवीचा अमावास्या उत्सव जल्लोषात साजरा

Shiroda News : यानिमित्त पहाटेपासूनच राज्याबरोबर शेजारच्या राज्यातील भाविकांनी देवीचा नवस फेडण्यासाठी तसेच नवस बोलून मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यासाठी गर्दी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा, थळ-शिरोडा येथील श्री कामाक्षी देवीचा पौष मास अमावास्या उत्सव शुक्रवार, ९ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला.

यानिमित्त पहाटेपासूनच राज्याबरोबर शेजारच्या राज्यातील भाविकांनी देवीचा नवस फेडण्यासाठी तसेच नवस बोलून मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यासाठी गर्दी केली होती.

यानिमित्त सकाळी श्री कामाक्षी, श्री रायेश्‍वर, श्री लक्ष्मीनारायण श्री शांतादुर्गा व पंचिष्ट दैवतांना विधिपूर्वक अभिषेक, पूजा व अन्य धार्मिक विधी श्री कामाक्षी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढवून सुगंधी फुलांनी सजविली होती.

दुपारी आरती, प्रसाद झाला. रात्री श्री लक्ष्मीनारायण पालखी तसेच श्री कामाक्षीदेवीची सुवर्णमूर्ती अधिष्ठित करून टाळमृंदगाच्या गजरात व मंगलवाद्याच्या तालात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाआरती झाल्यावर देवीचे स्तोत्रपठन, गाऱ्हाणे व प्रसाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT