Goa Stampede Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra Stampede: शिरगावातील चेंगराचेंगरीला प्रशासन जबाबदार! महाजनांचा आरोप; मृतांच्या कुटुंबीयांना 1 लाख जाहीर

Shirgao Stampede: दुर्घटनेत बळी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख सानुग्रह मदत तसेच जखमींना २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sameer Panditrao

डिचोली : शिरगावातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला देवस्थान समिती अजिबात जबाबदार नाही. उलट प्रशासनाचा हलगर्जीपणाच दुर्घटनेस कारणीभूत ठरला, असा घणाघाती आरोप आज (रविवारी) श्री लईराई देवस्थानच्या सर्वसाधारण सभेत महाजनांनी केला.

या दुर्घटनेत बळी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख सानुग्रह मदत तसेच जखमींना २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देवस्थान समितीने बैठकीनंतर दिली.

श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) देवस्थानच्या महाजनांची एक बैठक बोलाविली होती. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेस सुमारे १०० महाजन उपस्थित होते.

देवस्थानचे मावळते अध्यक्ष गणेश गावकर यांनी दुर्घटनेला विद्यमान समिती जबाबदार असल्याचे वक्तव्य या दुर्घटनेनंतर केले होते. या वक्तव्यावरून सभेत काहीशी वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप झाले. सरकारच्या सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात विद्यमान देवस्थान समितीवर ठपका ठेवला आहे.

तशी माहिती समाजमाध्यमांतून मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्ष अहवालाची प्रत देवस्थान समितीला मिळालेली नाही. त्यामुळे महाजनांनी नाराजी व्यक्त केली. अहवालाची प्रत मिळाल्यानंतरच पुढील कृती निश्चित करण्याचे सभेत ठरविण्यात आले.

Goa Stampede

बैठकीवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासकीय अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

मंत्रजपासह महारुद्र अनुष्ठान

शिरगाव दुर्घटनेतील मृतात्म्यांना शांती मिळो आणि भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, असे साकडे घालत मंत्रजपाने श्री लईराई देवस्थानतर्फे शनिवारी महारूद्र अनुष्ठान विधी झाला. देवस्थान समिती, ग्रामस्थ चौगुले आणि महाजनांतर्फे या विधीचे आयोजन केले होते. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी यावेळी दिली.

प्रशासनाचा चालढकलपणा

दरवर्षी श्री लईराई देवीच्या जत्रेपूर्वी १५ दिवस अगोदर पूर्वतयारीसाठी बैठक घेण्यात येते. यंदा मात्र तसे झाले नाही. नवीन देवस्थान समितीने ताबा घेतल्यानंतर समितीने लगेच २ एप्रिल रोजी देवस्थानच्या प्रशासकांना पत्र पाठवून जत्रेच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेण्याची विनंती केली होती. ही बैठक घेण्यास जवळ जवळ महिनाभर चालढकलपणा करण्यात आला, असा आरोप दीनानाथ गावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT