Goa Shimagotsav 2022 Instagram /@GoaTourism
गोवा

ओस्सय...ओस्सय म्हणत गोव्यात शिगमोत्सवाला सुरुवात

गोव्यात शिगमोत्सवाला खूप जल्लोषात साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

शिरोडा: ढोलताशांच्या आणि कासाळ्याच्या निनादात ‘ओस्सय...ओस्सय’ करून जतीच्या तालावर नाचगात शिवनाथी शिरोडा येथील श्री शिवनाथाचा चतुर्दशी शिगमोत्स (Shigmotsav) मोठ्या उत्साहात काल साजरा करण्यात आला.

यानिमित्त शिरोडा गावातील विविध वाड्यांवरील गुरुमांडावरून रोमटामेळ पारंपरिक शिमगो वेशात डोक्यावर रंगीत फेटे बांधून, गळ्यात पुष्पहार घालून, हातात गुढ्या-तोरणे अबदागिरे छत्री घेऊन नाचतगात होते. सर्व मेळ शिरोडा बाजार परिसरात एकत्रित आले. त्यानंतर बाजारातून रोमटामेळाची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने शिवनाथीला निघाली. रोमटामेळ श्री शिवनाथ मंदिराच्या प्राकारात आल्यावर रोमटामेळातील लोकांनी वाद्याच्या तालात जती गात आपली सेवा श्रीं चरणी समर्पित केली.

ओस्सय...ओस्सय’, ‘व्‍वा...व्‍वा किती आनंद झाला’ जती गात ढोलताशांच्या निनादात बोरीच्या श्री नवदुर्गा संस्थानात आज बुधवारी चतुर्दशी शिमगोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक शिमगो वेशभूषा करून, डोक्याला फेटे बांधून, हातात गुढ्या, गळ्यात पुष्पमाला घालून अबदागिरे, तोरणे, छत्र्या, नाचवत ‘आम्ही आलोय नवदु्र्गेच्या भेटी रे’, जती गात बोरी गावातील विविध भागांतील रोमटामेळांनी नाचतगाजत श्री नवदुर्गा मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. देवस्थानचे अध्यक्ष श्‍‍याम प्रभुदेसाई, सुनील सावकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रोमटामेळांचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT