Shikha Pandey has been retained as the captain of the women's team for the senior women's T20 cricket tournament
Shikha Pandey has been retained as the captain of the women's team for the senior women's T20 cricket tournament Dainik Gomantak
गोवा

Goa: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी महिला संघाच्या कर्णधारपदी शिखा पांडे कायम

दैनिक गोमन्तक

पणजी: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिखा पांडे हिला कर्णधारपदी कायम राखण्यात आले आहे. स्पर्धेतील गोव्याची मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होईल. गोव्याच्या गटातील सामने गुवाहाटी येथे 11 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत होतील.

(Shikha Pandey has been retained as the captain of the women's team for the senior women's T20 cricket tournament)

या गटात गतविजेते रेल्वे, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू असे मातब्बर संघ असल्यामुळे गोव्याच्या महिला संघाचा कस लागण्याचे संकेत आहेत. जम्मू-काश्मीर, गुजरात, अरुणाचल प्रदेश, बिहार हे गटातील अन्य संघ आहेत.

गोव्याचा पहिला सामना रेल्वेविरुद्ध 11 ऑक्टोबरला खेळला जाईल. 12 रोजी तमिळनाडूविरुद्ध, तर १४ रोजी जम्मू-काश्मीरविरुद्ध लढत होईल. त्यानंतर अनुक्रमे गुजरात (ता. १६), अरुणाचल प्रदेश (ता. १८), बिहार (ता. २०) व मध्य प्रदेश (ता. २२) या संघांविरुद्ध गोव्याचा महिला संघ खेळेल.

गोव्याचा सीनियर महिला संघ: शिखा पांडे (कर्णधार), सुनंदा येत्रेकर, संजुला नाईक, विनवी गुरव, तेजस्विनी दुर्गड, निकिता मळीक, पूर्वजा वेर्लेकर, इब्तिसाम शेख, पूर्वा भाईडकर, तनया नाईक, रुपाली चव्हाण, श्रेया परब, मेताली गवंडर, दिव्या नाईक, सावली कोळमकर, ऊर्वशी गोवेकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: CM सावंत यांनी पुन्हा घडवलं माणुसकीचं दर्शन; अपघात पाहताच तात्काळ थांबवला ताफा

Margao News : मडगावसह परिसरात १२,९८९ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे नोंद; सर्वाधिक गुन्‍हे नो एन्ट्रीत प्रवेश करणाऱ्यांचे

Margao: मडगाव पोलिस स्टेशन समोरच स्वत:ला भोकसले, परप्रांतीय व्यक्ती गंभीर जखमी

Vasco News : मुरगावात मान्सूनपूर्व कामे रखडली; पालिकेला मुहूर्त मिळेना

Lok Sabha Elections : अतिआत्मविश्वास कधीच बाळगला नाही : डॉ. दिव्या राणे

SCROLL FOR NEXT