Bhajan Competition Dainik Gomantak
गोवा

Vasco News : भजन स्पर्धेत शारदा संगीत विद्यालयास प्रथम क्रमांक

Vasco News : प्रथम उत्तेजनार्थ हेडलॅन्ड सडा येथील मोरुडकर भजनी पथकाला तर दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस नवेवाडे वास्को येथील ओम विष्णू कला संघाने पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, मांगुरहिल संभाजीनगर येथील श्री सिद्धिविनायक व्यंकटेश मंदिराच्या बाराव्या वर्धापनदिनाप्रित्यर्थ आयोजित दक्षिण गोवा मर्यादित भजन स्पर्धेत हेडलॅन्ड सडा येथील शारदा संगीत विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

दुसरे बक्षीस कवळे फोंडा येथील शांतादुर्गा भजनी मंडळाने तर तिसरे चिखली वास्को येथील श्री रामनाथ दामोदर भजनी पथकाने प्राप्त केले. प्रथम उत्तेजनार्थ हेडलॅन्ड सडा येथील मोरुडकर भजनी पथकाला तर दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस नवेवाडे वास्को येथील ओम विष्णू कला संघाने पटकावले.

एकूण पाच भजनी पथकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट गायकाचे पहिले बक्षीस संदेश नाईक (शांतादुर्गा भजनी मंडळ), उत्कृष्ट गौळण गायक केदार तोरस्कर (शारदा संगीत विद्यालय),

उत्कृष्ट संवादिनीसाथी राहूल तिरोडकर (मोरुडकर भजनी पथक), तर उत्कृष्ट पखावजसाथी म्हणून शुभम सावंत (श्री रामनाथ दामोदर भजनी पथक) यांना अनुक्रमे प्राप्त झाली. स्पर्धेचे परीक्षण दुर्गाकुमार नावती व सुभाष चंद्रु आलपारकर यांनी केले.

स्पर्धेचे सूत्रसंचालन रक्षा साळगांवकर हिने केले. सुरुवातीला दीपप्रज्वलनाने भजनी स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले.

उद्योजक योगेश व्ही. धेंपो, दुर्गाकुमार नावती, सुभाष आलपारकर, संस्था अध्यक्ष प्रशांत नार्वेकर, सचिव राजन नाईक, खजिनदार किशोर सोपटे, इतर संस्था सभासद उपस्थित होते.प्रशांत नार्वेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT