Rape on Minor in Goa Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! साळगावात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; मुलीचा गर्भपात करण्यासाठी बापाची डॉक्टरांकडे धाव

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kavya Powar

Rape on Minor in Goa: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेची बाब बनल्या आहेत. साळगावातून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुलीचा गर्भपात करण्यासाठी बापाची डॉक्टरांकडे धाव...

माहितीनुसार, साळगावात दोन वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. साळगाव पोलिसात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या प्रकरणात, एका अल्पवयीन मुलीचे पालक त्यांच्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

तर दुसऱ्या प्रकरणात, एका अल्पवयीन मुलीवर ती राहत असलेल्या परिसरातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला गर्भधारणा झाली होती. या दोन्ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 5 महिन्यांपूर्वी मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पीडितेच्या वडिलांना आपली मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

लैंगिक अत्याचाराच्या या वाढत्या प्रकरणांमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT