Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

सुका मेवा खायला देण्याच्या बहाण्याने 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

Goa Rape Case | या प्रकरणी पोलिसांनी फिरोज समशुद्दीन अब्दुल अन्सारी या 18 वर्षीय युवकाला अटक केली आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : सुका मेवा खायला देतो असे सांगून एका 8 वर्षाच्या मुलीला अडगळीच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मायणा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. मागच्या चार दिवसात या पोलीस स्थानकाच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची ही दुसरी घटना उजेडात आली आहे. (Sexual Assault on 8 year old girl in goa )

या प्रकरणी पोलिसांनी फिरोज समशुद्दीन अब्दुल अन्सारी या 18 वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयित त्या मुलीचा शेजारी असून 30 मे रोजी ही घटना घडली होती. सुका मेवा खायला देण्याच्या बहण्याने त्याने त्या पीडितेला नेसाय येथील निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केला.

या घटनेची त्या मुलीच्या घरच्यांना माहिती मिळाल्यानंतर काल रात्री त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. यावरून आज त्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक दीपा देयकर पुढील तपास करीत आहेत.

यापुर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत जगदीश मुदलकर या 31 वर्षीय इसमाने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी त्याला अटक केल्यानंतर जामीन मिळावा यासाठी त्याने बाल न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर सादर केले असता त्याच्या पोलीस कोठडीचा रिमांड आणखी चार दिवसांनी वाढवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT