Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण; दोघांना अटक

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार व छळप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Bicholim Rape Case: राज्‍यात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. डिचोली आणि सासष्टी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार व छळप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

डिचोली तालुक्यातील एका विद्यालयातील वरिष्ठ कारकून दयानंद घाटवळ (59वर्षे) याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

संशयित हा विद्यालयात वरिष्ठ कारकून आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कराटे प्रशिक्षकाने काही अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी डिचोलीत उघडकीस आली होती.

आतापर्यंत चार वेगवेगळे गुन्हे महिला पोलिस स्थानकात दाखल झाले आहेत. दुसऱ्या घटनेत मूळ कर्नाटकमधील व गेली अनेक वर्षे सासष्टी तालुक्यात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विजय लमाणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आणि संशयिताची मैत्री होती. त्याचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: बुधाच्या राशीबदलाचा मोठा प्रभाव! 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळणार मोठे यश

Marwar History Rathore Dynasty: औरंगजेबालाही झुकवणारा रणधुरंधर! दुर्गादास राठोडांनी 30 वर्षे लढून वाचवले 'मारवाड'चे स्वातंत्र्य

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT