Sewerage system collapsed in Mandrem Dainik Gomantak
गोवा

मांद्रेत गटार व्यवस्था कोलमडली, पावसाचे पाणी रस्त्यावर

Sewerage Water on Road : मांद्रे मतदारसंघातील केरी तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये व विर्नोडा या नऊही पंचायत क्षेत्रातील मुख्य व अतर्गत रस्त्यांवरील गटार व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रे मतदारसंघातील केरी तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये व विर्नोडा या नऊही पंचायत क्षेत्रातील मुख्य व अतर्गत रस्त्यांवरील गटार व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी तुंबले असून यातून वाहन चालवणे धोकादायक बनत आहे.

काही पंचायतींनी मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याने ठिकठिकाणी गटारे भरून वाहताना दिसत आहेत. मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा, मरडी वाडा, मधला वाडा, खिंड व वर्णा वाडा या ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे , रस्त्यालगत पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार व्यवस्थेची कोणतीच उपाय योजना केली नाही .

आगरवाडा चोपडे पंचायत क्षेत्रातील चोपडे जंक्शन ते खिंड पर्यंत या रस्त्याचे सुशोभीकरण करण्याचे काम गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा निधी किमान पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करुन करण्यात आले. परंतु गटार व्यवस्थेचे नियोजन न केल्याने आज रस्त्यावर पाणी साचून रहात असल्याचे चित्र दिसत होते.

बांधकाम साहित्याचा अडसर !

रस्त्याच्या बाजूला बांधकामे करत असताना लागणारे बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले जाते. हे बांधकाम साहित्य वाहतुकीस अडथळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाला आपल्या रस्त्याचे काहीही पडलेले नाही. या खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम साहित्य कुठेही ठेवले जाते, रस्त्याच्या बाजूची गटार व्यवस्था कोलमडल्याने पाणी रस्त्यावर साचून डबकी तयार झाली आहेत.

शेती धोक्यात

या पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला शेतात मातीचा भराव टाकून बांधकामे जोरात चालू आहेत. या बांधकामांमुळे एका शेतातून दुसऱ्या शेतात पावसाचे पाणी जात नसल्याने शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी शेवाळ झाले असून काही ठिकाणी भात शेतीची रोपे कुजत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT