सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांडपाण्याची पाहणी करताना  Dainik Gomantak
गोवा

दाबोळी येथे सांडपाण्याची सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाहणी...

दोन दिवसात पूर्ण सांडपाण्याची वाहिनी दुरुस्त करण्यात येईल अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुरगाव सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या (Goa Rehabilitation Board) वसाहतीतील रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या सांडपाण्याची सार्वजनिक बांधकाम भूगटार विभागातर्फे पाहणी करण्यात आली. सदर वसाहतीतील वाहिनीतील सांडपाणी साचून रस्त्यावरून वाहत असल्याची तक्रार गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर (Parashuram Sonurlekar) यांनी वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागात केली असता संबंधित विभागाने ही वाहिनी त्वरित दुरुस्त करणार अशी माहिती वसाहतीतील रहिवाशांना दिली.

मुरगाव सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीतील सांडपाणी वाहिनीत साचून चक्क रस्त्यावरून वाहत असल्याने संपूर्ण वसाहतीत दुर्गंधी पसरली होती. तसेच वसाहतीच्या बाजूस विद्यालय असल्याने तेथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

सांडपाणी वाहत असलेल्या बाजूस वीज विभागाचे ट्रांसफार्मर असून तेथे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने त्वरित ही वाहिनी दुरुस्त करण्याची मागणी गोवा फर्स्टचे निमंत्रक सोनुर्लेकर यांनी केली होती.

दरम्यान सोनुर्लेकर यांच्या तक्रारीची दखल घेऊन बायणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) अधिकाऱ्यांनी मुरगाव सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीत जाऊन सांडपाणी वाहत असलेल्या जागेची पाहणी केली.

तसेच येत्या दोन दिवसात पूर्ण सांडपाण्याची वाहिनी दुरुस्त करण्यात येईल अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करताना वीज विभागाचे अधिकारीसुद्धा तेथे उपस्थित असणार असल्याचे माहिती गोवा फर्स्टचे निमंत्रक सोनुर्लेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT