Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात तीव्र पाणीटंचाई - काँग्रेस

हा भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणि गैरव्यवस्थापनाचा परिपाक आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Water Shortage एप्रिलच्या मध्यावरच राज्यातल्या अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

हा भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणि गैरव्यवस्थापनाचा परिपाक आहे, असा आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

पणजीकर म्हणाले की, नागरिकांना दररोज 4- 5 तास पाणी देता येत नसेल, तर आपण सरकार चालवण्यासाठी अकार्यक्षम आहोत, अशी कबुलीच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे.

सध्या अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून 2-3 दिवस पाणीच येत नाही. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

हे सरकारच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. सरकार चालवण्यासाठी आपण लायक नाही, असे जर मंत्रीच म्हणत असतील तर या सरकारने पायउतार झालेले बरे.

राज्यातल्या पाणीटंचाईची स्थिती एप्रिलच्या मध्यावरची असून अद्याप पाऊस सुरू होण्याला दोन महिने अवकाश आहे. पुढील दोन महिने उन्हाळा वाढत जाणार आहे. या दोन महिन्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तीव्र होत जाईल. सरकारने त्यांचे अपयश लपवण्यासाठी कारणे सांगू नयेत.

त्याऐवजी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करावे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साठवण्यासाठी जलाशयांची गरज आहे, याची जाणीव या सरकारला नव्हती का? मग काम का सुरू केले नाही? असे पणजीकर म्हणाले.

केवळ निवडणुकीपुरती आश्वासने

प्रत्येक निवडणुकीवेळी भाजप नेहमीच 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देतो. मात्र, अकार्यक्षमता आणि गैरव्यवस्थापनामुळे ही आश्वासने त्यांनी कधीच पूर्ण केली नाहीत.

आता त्यांनी कर्नाटकात भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली असून, यासाठी म्हादईबाबत तडजोड केली आहे.

भविष्यात आम्हाला पाणी मिळणार नाही आणि म्हादई विकण्याच्या या कृत्याला फक्त भाजपच जबाबदार असेल, असे पणजीकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘हर घर जल’ प्रमाणित करणारे पहिले राज्य बनल्याबद्दल गोवा सरकारचे अभिनंदन केले होते. याचा अर्थ गोव्यातील प्रत्येक घराला पाईपने पाणी देण्यात आले. पण पाणीच नाही तर अशा कनेक्शनचा उपयोग काय?

- अमरनाथ पणजीकर, अध्यक्ष, काँग्रेस मीडिया सेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT