पालोमा व्हिएगश Dainik Gomantak
गोवा

Goa : पालोमा व्हिएगशला प्रतिष्ठेचा 'डायना पुरस्कार'

पालोमा ही मानसीक आरोग्य प्रचारक (Mental health promoters) असुन तिची या संदर्भात एक वेबसाईट पण आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : सतरा वर्षीय पालोमा व्हिएगशला प्रतिष्ठेच्या डायना पुरस्काराने (Diana Award) आज सन्मानित करण्यात आले. पालोमा ही प्रविण व सोफिया व्हिएगश यांची कन्या. त्यांचे मुळ घर लोलये काणकोण (Canacona) पण पालोमा दुबईतील जेम्स अवर ओन इंग्लिश हायस्कुलमध्ये शिकत आहे.(17-year-old girl from Goa receives prestigious Diana Award)

पालोमा ही मानसीक आरोग्य प्रचारक (Mental health promoters) असुन तिची या संदर्भात एक वेबसाईट पण आहे. मानसीक आरोग्याबद्दल ती शाळांमध्ये मार्गदर्शन करीत आहे. तिने हवा शुद्धीकरणासाठीच्या नमुन्याचा शोध लावला असुन त्यापासुन लोकांना हवा दुषितीकरणापासुन संरक्षण मिळते. आपले जिवन दुसऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी अर्पित करण्यासाठी तिचा वकिल बनण्याचा मानस आहे. तिला हा जो पुरस्कार मिळाला आहे तो प्रिंसेस ऑफ वेल्स डायना हिच्या स्मृतिप्रितर्थ्य प्रायोजित करण्यात आला आहे.

हा पुरस्कार देणारी जी धर्मादाय संस्था आहे त्यास डायनाचे दोन्ही पुत्र द ड्युक ऑफ कॅम्ब्रीज व द ड्युक ऑफ ससेक्स यांचे पाठबळ आहे.ह्या पुरस्काराचे विजेते निवडताना कठीण अशी प्रक्रिया अवलंबिली जाते. या पुरस्कारासाठी ज्याचे नामांकन झाले आहे त्या व्यक्तिची दृष्टी, सामाजिक परिणाम, दुसऱ्यासाठी स्फुर्तीदायकता, युवा नेतृत्व व सेवा प्रवास अशा पांच गुणांचा अभ्यास केला जातो.

फातोर्डाचे (Fatorda) आमदार, गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी पालोमा तसेच त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. सुनिता व प्रविण गोवा फॉरवर्डचे सदस्य असुन त्यांनी संयुक्त अरब अमारतीमध्ये गोवा फॉरवर्डची मुहुर्तमेढ रोवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT