Minister of Social Welfare Subhash Phaldesai and senior Citizen Dainik Gomantak
गोवा

Goa News : ज्‍येष्‍ठांसाठी करणार अर्थसंकल्पात तरतूद ! मंत्री सुभाष फळदेसाई

गोवा १४ वर्षांनंतर स्वतंत्र झाला, तरीसद्धा अनेक क्षेत्रांमध्ये इतर राज्यांच्‍या तुलनेत आपले राज्‍य आघाडीवर आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक योजनांचा समावेश आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : सासष्टी, : ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक गरजा असतात. त्यांच्या कल्याणासाठी ज्या संस्था वावरतात, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी घोषणा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज केली.

मडगावच्या रवींद्र भवनात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक व शारीरिक स्वास्‍थ्‍य गरजेचे असल्याने त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करण्याच्‍या हेतूने योजना सुरू करण्‍याचा विचार आहे.

गोवा १४ वर्षांनंतर स्वतंत्र झाला, तरीसद्धा अनेक क्षेत्रांमध्ये इतर राज्यांच्‍या तुलनेत आपले राज्‍य आघाडीवर आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक योजनांचा समावेश आहे

. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठीची मर्यादा २४ हजारांवरून १.५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा सरकार विचार करत आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डायगो डिकॉस्‍टा यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. न्यू ईरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या तसबिरींना पुष्‍पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक व शारीरिक स्वास्‍थ्‍य गरजेचे असल्याने त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करण्याच्‍या हेतूने योजना सुरू करण्‍याचा विचार आहे. गोवा १४ वर्षांनंतर स्वतंत्र झाला, तरीसद्धा अनेक क्षेत्रांमध्ये इतर राज्यांच्‍या तुलनेत आपले राज्‍य आघाडीवर आहे.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

राज्‍यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘उम्मीद’ केंद्रांसाठी समाजकल्याण खात्यातर्फे आर्थिक साहाय्य देण्यात येते. सध्‍या गोव्यात २४ केंद्रे आहेत. अशी केंद्रे स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढे यावे. त्‍यांनासुद्धा मतदानाचा हक्क असल्‍याने कुठलेही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करूच शकत नाही.

- दिगंबर कामत, मडगावचे आमदार

आपल्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. वडीलधारी व्यक्ती घरात असणे आज खूप गरजेचे आहे. कारण ती काळाची गरज बनली आहे. त्यांचे मार्गदर्शन व सल्ला लाखमोलाचा असतो. त्‍यामुळे अनेक वाईट घटना टळू शकतात. सरकारनेही ज्‍येष्‍ठ नागरिकांकडे प्राधान्‍याने लक्ष द्यावे. - उल्हास तुयेकर, नावेलीचे आमदार

या ज्‍येष्‍ठांना करण्‍यात आले सन्‍मानित

समाजकल्याण खाते, अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक महासंघ व रवींद्र भवन मडगाव यांच्‍यातर्फे आयोजित या कार्यक्रमात खात्यातर्फे १८ व महासंघातर्फे ९ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

त्यात विश्र्वास पालयेकर, श्रावण मिरजकर, चंद्रकांत जे. पंडित, डॉ. ब्रह्मानंद एस. कुंकळयेकर, आंतोनियो साल्वादोर फर्नांडिस, पुरुषोत्तम ए. दामले, तुळशी नाईक, दत्ता गोविंद प्रभू मोनी, मारिया एन डिसोझा, जुझे निकोलाव दो रुझारियो कुलासो, उदय शांताराम सावर्डेकर, मधू बाबू देसाई, रॉकेझिनो डिसोझा, उमेश आत्माराम प्रभू मळकर्णेकर,

विठ्ठल आर. खांडेपारकर, मिलिंद म्हाडगुत, धनंजय बाबली कालेकर, झुलो शेट, प्रिंस जेकब, चंद्रकांत मळकर्णेकर, वामन प्रभू गावकर, ॲड. जगदीश प्रभुदेसाई, मार्टिन पीरिस, पांडुरंग फुग्रो, ॲड. मुकुंद मलिक, फा. जॉर्ज क्वाद्रोस, डॉ. फ्रान्‍सिस कुलासो यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT