Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: महिलेला पाठवले अश्लील फोटो, संदेश! फोनवर केली लैंगिक सुखाची मागणी; न्यायालयाने फेटाळला दोषमुक्तचा अर्ज

Goa Crime News: अश्लील फोटो पाठवणे आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला दोषमुक्त करण्याचा अर्ज मेरशी येथील ‘फास्ट ट्रॅक कोर्ट-१’ न्यायालयाने फेटाळून लावला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अश्लील फोटो पाठवणे आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला दोषमुक्त करण्याचा अर्ज मेरशी येथील ‘फास्ट ट्रॅक कोर्ट-१’ न्यायालयाने फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी हा निर्णय दिला. १७ सप्टेंबर २०२५ रोजी फोंडा येथील माशेल-देऊळवाडा भागात ही घटना घडली होती.

आरोपीने तक्रारदार महिलेच्या व्हॉट्सॲपवर अश्लील मजकूर आणि लैंगिक कृत्यांचे फोटो पाठवले होते. इतकेच नव्हे तर, त्याने लैंगिक सुखाची मागणी देखील केली होती. हे कृत्य महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करणारे असल्याचे न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे.

हा प्रकार गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २६२ अंतर्गत दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. आरोपीला दोषमुक्त करण्यास नकार देत न्यायालयाने त्याच्यावर भारतीय न्याय संहिताच्या कलम ७५, ७९ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ आणि ६७-ए अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राध्यापकाला सशर्त जामीन मंजूर

पणजी येथील पाटो परिसरातील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या ३५ वर्षीय प्राध्यापक एम. मल्लीकार्जुन (आंध्र प्रदेश) याला मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी, संशयितांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

मात्र, आता परिस्थितीत बदल झाला असल्याचे न्यायालयाने नमूद केले. पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून, केवळ इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे या कारणास्तव संशयिताला न्यायालयीन कोठडीत ठेवता येणार नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनि नोंदवले. पणजीतील पाटो येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केल्यावर पणजी पोलिसांनी त्याच दिवशी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयिताला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT