Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho : बार मालकांवर आता मद्यपींचा भार; तळीरामांना घरी पोहोचवावं लागणार

मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mauvin Godinho : गोव्यात दारुचे सेवन करणाऱ्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बारमालकाची आहे, असं वक्तव्य मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलं आहे. यावर कायदेशीर तरतुदींची तपासणी करण्यासाठी आणि प्रभावी अमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचं गुदिन्हो यांनी म्हटलं आहे. गुदिन्होंच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

गोव्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असतात. यातील बहुतांश पर्यटक गोव्यात मद्य स्वस्त असल्यामुळे मद्यपान करुन वाहन चालवतात. गोव्यात सध्या अपघातांचं प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे. या अपघातांना प्रामुख्याने ड्रंक अँड ड्राईव्ह हे कारण असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आता या सगळ्याचा भार बारच्या मालकांवरच टाकण्याचं सूतोवाच केलं आहे. असं असलं तरीही गुदिन्होंच्या या मोहीमेला बार मालकांकडून सुरुंग लागण्याची शक्यता आहे. बार मालक याला विरोध करण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात सध्या गोव्यात कडक कारवाई सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी मद्य घेऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली होती. अनेकदा अपघात हे मद्याच्या नशेत होत असल्याने पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटर चाचणी सुरू केली होती. त्यानंतर पुन्हा केलेल्या मोहिमेत 1011 जण आढळून आले आहेत. या गुन्ह्यासाठी कैदेची जास्तीत जास्त सहा महिने शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई आहे.

मद्यप्राशन करून वाहने चालवताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करून प्रकरण न्यायालयाकडे पाठवण्यात येते. शिक्षा व दंडाची कारवाई देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. वाहनचालकांनी सीट बेल्ट न लावल्याप्रकरणीची 676 प्रकरणे नोंद झाली आहेत. भरधाव वेगाने वाहने चालविल्याप्रकरणी 701 प्रकरणे नोंद झाली आहेत. अजूनही चालक सीट बेल्ट घालत नाहीत. रस्ता अपघातावेळी हेल्मेट नसल्याने मद्यप्राशन करून वाहन चालवणे तसेच भरधाव वाहन हाकणे ही अपघाताला निमंत्रण देणारी आहेत. त्यामध्ये अनेकांना मृत्यूलाही सामोरे जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT