Bihar Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सायपे येथे शाळकरी मुलीचा विनयभंग; संशयित पर्वरी पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime News: संशयिताविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ७४ व ७५, पोक्सो कायदा कलम ८ व १२ आणि गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: सायपे, मार्रा-पिळर्ण येथे १० वर्षी़य शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जालम रामदयाळ महोर (वय ५२ वर्षे, मूळ मध्य प्रदेश) या सुरक्षा रक्षकाला पर्वरी पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी संशयित नोकरी करत असलेल्या व्हिलामधील केअरटेकरची मुलगी आहे.

ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. संशयिताने मुलीला आपल्याकडे बोलावले आणि तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी पीडितेने आई-वडिलांच्या कानी घातला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली. संशयिताविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ७४ व ७५, पोक्सो कायदा कलम ८ व १२ आणि गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT