Secretly-shot video of Goa politician at private party in 3-star hotel on mumbai pune highway  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'त्या' नेत्याचे रंगेल कारनामे चर्चेत

सागरिका शोना सुमन या मॉडेल अभिनेत्रीला एका रात्रीच्या सोबतीला 2 लाखांची ऑफर देणाऱ्या गोव्यातील 'त्या' राजकारण्याचे आणखी काही रंगेल कारनामे सध्या चर्चेत

Priyanka Deshmukh

पणजी: मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) असलेल्या 3-स्टार हॉटेलमध्ये (3star Hotel) एका खाजगी पार्टीमध्ये दक्षिण गोव्यातील केपेमधील (Quepem in South Goa) एका नेत्याचा गुप्तपणे काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

सागरिका शोना सुमन या मॉडेल अभिनेत्रीला एका रात्रीच्या सोबतीला 2 लाखांची ऑफर देणाऱ्या गोव्यातील 'त्या' राजकारण्याचे आणखी काही रंगेल कारनामे सध्या चर्चेत आहेत. पुणे - मुंबई हायव्हेवर असलेल्या एका थ्री स्टार हॉटेलजवळ सदर राजकारणी एका युवतीच्या हातात हात घालून हॉटेलमध्ये शिरत असताना दिसत असल्याचा व्हिडीओ शूट झाल्याचा दावा पुण्यातील एका संकेतस्थळाने केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबई येथील आपल्या बिल्डर मित्रा बरोबर हा राजकारणी त्या हॉटेलमध्ये गेला होता. त्यांच्या बरोबर असलेल्या युवती हाय क्लास कॉल गर्ल्स असल्याचा या संकेतस्थळाचा दावा आहे. या राजकारण्याचे आणखीही एक अवघडलेल्या स्थितीत असताना काढलेला व्हिडीओ असून हे दोन्ही व्हिडीओ एकत्रित करून सुमारे 4 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत असेलला नेता मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्याच्या अस्थिर चालीवरून दिसून येत आहे. या खासगी पार्टीत संगीतही जोरदार सुरू आहे. आणि हा नेता त्या कॉल गर्ल्स सोबत विशिष्ट खोलीत प्रवेश करतात स्पष्टपणे दिसत आहे.

संबंधित नेता आर्थिक उलाढालीशी आणि जुगाराशी संबंधित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. केंद्रीय एजन्सींकडून त्याची चौकशी केली जात होती. त्याने दोन वर्षांपूर्वी अनेक राजकारण्यांसह पक्ष बदलले आहे. व्हिडिओ क्लिप्सच्या डाउनलोड केलेल्या प्रती या पोर्टलच्या ताब्यात आहेत.

आगामी मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमन जी यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रथमच मीडियाशी उघडपणे बोलली होती, तिने पत्रकार परिषदेत बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे अश्लील रॅकेट उघड केले होते. तिच्‍या म्हणण्यानुसार, 2019 पासून ती चित्रपटसृष्टीत सक्रियपणे काम शोधत आहे आणि मार्च 2020 पासून लॉकडाऊनमुळे तिच्यासारख्या आगामी कलाकारांसाठी परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. अशा स्‍थितीत जीतू नामक एका व्‍यक्तीने आपल्‍याला ‘ऑफर’ आणली. जीतूने तिला सांगितले की, जो व्यक्ती प्रकल्पांना प्रायोजित आणि निधी देईल तो गोवा-कर्नाटक सीमेजवळील मतदारसंघातील दक्षिण गोव्याचा एक शक्तीशाली राजकारणी आहे आणि तिला ‘मदत’ हवी असेल तर तिला त्याच्यासोबत रात्र घालवावी लागेल. गोव्यातील एका खासगी फ्लॅटमध्ये राजकारण्यासोबत सुमारे चार ते पाच तास किंवा एक रात्र घालवण्यासाठी दोन लाख रुपये दिले जातील आणि सर्व प्रवास आणि इतर खर्च त्याच्याकडून केला जाईल. अर्थात आपण ती ऑफर फेटाळली असे सागरिका म्‍हणाली. संबंधित राजकारण्‍याचे नाव आपण योग्‍य वेळी उघड करेन असेही तिने स्‍पष्‍ट केले आहे.‍

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT