Goa College Admission Dainik Gomantak
गोवा

Goa College Admission: कॉलेज प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; पहिल्या फेरीत 12 हजार अर्ज दाखल

उच्च शिक्षण संचालनालयाची माहिती

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa College Admission: गोव्यातील कॉलेज प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत 12 हजार अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती, उच्च शिक्षण संचलनालयाचे डॉ. महादेव गवस यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, पहिल्या फेरीत त्यांना सुमारे 12 हजार अर्ज आले. 7600 विद्यार्थ्यांना सरकारी अनुदानित तर 1400 विद्यार्थ्यांना सेल्फ फायनान्स प्रोग्राममध्ये प्रवेश मिळाला आहे. विभागाने विद्यार्थ्यांना NEP मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला 29 मे पासून प्रारंभ झाला होता.

उच्च शिक्षण संचालनालय (DHE) गोवा यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी तसेच बी.ए., एल.एल.बी., बी.ए.बी.एड, संगीत, थिएटर, होम सायन्स, बीएससी अॕग्रीकल्चर, बीसीए, बीबीए, पीजीडीटी, पीजीडीसीए, बीपीएड या विभागांसाठीची ही फेरी होती.

https://dhe.goa.gov.in/resource/getPage/ugadmissions वर उपलब्ध असलेल्या कॉमन पोर्टलद्वारे अर्ज करता येतात. विद्यार्थी त्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तसेच कोणत्याही साहाय्यासाठी प्रवेशाच्या तारखांना महाविद्यालये किंवा DHE गोवा कार्यालयातदेखील भेट देऊ शकतात.

पोर्टल अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करेल. संबंधित महाविद्यालयाच्या वेबपोर्टलवर मोफत ई-प्रॉस्पेक्टस उपलब्ध असेल. सेल्फ फायनान्स प्रोग्राम्ससाठी पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. अर्जदार प्राधान्यांच्या आधारावर गोव्यातील जास्तीत जास्त तीन महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT