Army Agniveer Dainik Gomantak
गोवा

Army Agniveer: अग्निवीरांची दुसरी तुकडी सज्‍ज, प्रशिक्षण पूर्ण

Army Agniveer: दीक्षांत सोहळा : 2058 जवान प्रत्‍यक्ष सीमेवर सैन्यदलात सहभागी होणार

दैनिक गोमन्तक

Army Agniveer: केंद्र सरकारच्‍या महत्त्वाकांक्षी अग्‍नीपथ योजनेअंतर्गत तयार करण्‍यात आलेली 2058 अग्निवीरांची दुसरी तुकडी प्रत्‍यक्ष सैन्‍यात जाण्यास सज्‍ज झाली असून आज नावेली येथील थ्री-एमटीआर रेजिमेन्‍टमध्‍ये झालेल्‍या दीक्षांत सोहळ्‍यात ब्रिगेडियर अरविंदरसिंग सहानी यांनी या जवानांना दीक्षा दिली.

या अग्निवीरांचे प्रशिक्षण 3 ऑक्‍टोबर रोजी पूर्ण होणार असून त्‍यानंतर त्‍यांना सैन्‍यात पाठविण्‍यात येणार आहे, असे ब्रि. सहानी यांनी सांगितले. यातील काहीजणांना प्रत्‍यक्ष सीमेवर जाऊन काम करण्‍याची संधी मिळणार अशीही माहिती त्‍यांनी दिली. या अग्निवीरांना गोव्‍यात सैनिकी प्रशिक्षण दिले गेले असले, तरी या दुसऱ्या तुकडीतही गोव्‍याचा एकही जवान नव्‍हता.

मागचे काही महिने नावेली येथील सैनिक तळावर या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण चालू होते. शारीरिक प्रशिक्षण, शस्‍त्र चालविण्‍याचे प्रशिक्षण, वाहनांतून गोळीबार करण्‍याचे प्रशिक्षण तसेच अत्‍याधुनिक यंत्रणेद्वारे केले जाणारे कार्य यांचे प्रशिक्षण देण्‍यात आले होते.

हे प्रशिक्षण शौर्यचक्र विजेते एम.के. शर्मा यांच्‍या देखरेखीखाली दिले गेले होते. आजच्‍या या दुसऱ्या तुकडीत देशाच्‍या विविध भागातून प्रशिक्षणासाठी आलेल्‍या अग्निवीरांचा समावेश होता.

यावेळी प्रशिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कामगिरी बजावल्‍याबद्दल रितीक यादव, ब्रिजेश कुमार आणि हेमंत कुमार यांना गौरविण्‍यात आले, तर गट प्रशिक्षणामध्‍ये उत्‍कृष्‍ट कामगिरी केल्‍याबद्दल अभिमन्‍यू पाल, सागर एहलावट आणि अभिषेक पांडे यांना पदक देऊन गौरविण्‍यात आले. या अग्निवीरांच्‍या पालकांनाही यावेळी गौरव पदक देऊन गौरविण्‍यात आले. या अग्‍निवीरांकडून प्रेरणा घेऊन आणखी युवक सैन्‍यात भरती होण्‍यासाठी तयार होतील, अशी आशा ब्रि. सहानी यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

Goa Accidents: दक्षिणेतील अपघाती मृत्यूत 84 टक्के घट; वाहतूक विभाग उपअधीक्षक प्रभुदेसाई यांची माहिती

Gajalakshmi Rajyog: सुखाचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगामुळे 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार अमाप संपत्ती आणि मानसन्मान

SCROLL FOR NEXT