cruise ship
cruise ship 
गोवा

इटलीतून खलाशी गोव्यात दाखल

Dainik Gomantak

दाबोळी

इटलीमध्ये अडकलेल्या ४१४ खलाशांना घेऊन येणाऱ्या तीन विशेष चार्टर विमानांपैकी पहिले विशेष चार्टर विमान १६८ गोमंतकीयांना घेऊन सकाळी १०.३० वाजता दाबोळी विमानतळावर दाखल झाले. तर दुसरे खास विमान संध्याकाळी पाचच्या दरम्यान आलेल्या दुसऱ्या खास चार्टर विमानातून १६७ गोमंतकीय दारखल झाले. अशाप्रकारे तीन खास विमानांपैकी दोन चार्टर विमाने दाखल झाली. या दोन्ही विमानात मिळून इटलीहून २३५ गोमंतकीय गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले. ते गोमंतकीय तीन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून कामाला होते.
इटलीमध्ये अडकलेल्या खलाशांना गोव्यात आणण्यासाठी मे. कॉस्ता क्रूस कंपनीने विदेशी व्यवहार मंत्रालयामार्फत गृहमंत्रालयाकडे विनंती केली होती. ती विनंती मान्य करण्यात आल्यानंतर तसेच इटलीहून येणाऱ्या चार्टर विमान गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर आज सकाळी १०.३० वाजता पहिले चार्टर विशेष चार्टर विमान १६८ गोमंतकीयांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर पोचल्यानंतर त्यांचे कोविड - १९ साठी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. विमानतळावर नमुने घेतल्यानंतर येथे उपलब्ध करण्यात आलेल्या बसमधून त्यांना पोलिस सुरक्षेत क्वारंन्टाईन केंद्रावर घेऊन जाण्यात दोन कदंब बसेस ठेवण्यात आल्या होत्या. या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर तसेच इतर कर्मचारी विमान पोहोचण्यापूर्वीच दाबोळी विमानतळावर उपस्थित होते. मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून व्यवस्थेची पाहणी केली.
दरम्यान इटलीहून दुसरे खास विमान आज सायंकाळी पाचच्या दरम्यान १६७ गोमंतकीयांना घेऊन दाखल झाले. अशाप्रकारे संध्याकाळ पर्यंत दोन खास चार्टर विमानातून २३५ गोमंतकीय दाखल झाले. त्यांचेही विमानतळावर नमुने घेतल्यानंतर येथे विमानतळावर उपलब्ध करण्यात आलेल्या बसमधून पोलीस सुरक्षेत क्वारनटाईन केंद्रावर नेण्यात आले. दरम्यान रात्री अन्य एक खास चार्टर विमान इटलीहून उर्वरित गोमंतकीयांना घेऊन येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.
इटलीहून गोमंतकीय बांधवाना घेऊन येणाऱ्या तिसऱ्या विमानातून गोव्यात अडकलेल्या इटलीतील १०० नागरिकांना परत पाठवण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे ते गोव्यात अडकले आहे. आतापर्यंत सात हजाराहून जास्त पर्यटकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. रशिया, स्पेन, ब्रिटन, इजराइल, जर्मनी, आदी राष्ट्रातील विदेशी पर्यटकांना ३७ खास विमानातून मायदेशी पाठवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT