Seaferer in goa upset over pension issue Dainik Gomantak
गोवा

पेन्शन न मिळाल्यामुळे खलाशी चिंतेत

आचारसंहिता संपल्यानंतर पेन्शन रकमेसाठी तरतूद, आयुक्तांची माहिती

दैनिक गोमन्तक

मडगाव : खलाशांसाठीची पेन्शन योजनेची मुदत डिसेंबरमध्ये संपलेली असली तरी खलाशांच्या खात्यामध्ये पेन्शनची रक्कम जमा केली नसल्याने खलाशी चिंतित झाले आहेत. जानेवारी महिन्यात या पेन्शन योजना वाढीसाठी सरकारने अधिसूचना काढली खरी, मात्र आचारसंहितेमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. (Seaferer in Goa News Updates)

गोव्याचे (Goa) अनिवासी भारतीय कमिशनचे आयुक्त नरेंद्र सावईकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले, की काही जणांनी कदाचित जीवन प्रमाणपत्र दिले नसल्याने त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नसेल. तसेच निवडणुकीसाठी (Election) लागू केलेली आचारसंहिता मागे घेतल्यानंतर पेन्शनच्या रकमेसाठी तरतूद केली जाईल, असेही सावईकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान गृह खात्याने खलाशी पेन्शन योजनेत अधिसूचनेद्वारे वाढ केली आहे. पण गृह खात्याने पेन्शन रक्कम खलाशांच्या खात्यात रक्कम जमा केली नाही. निवृत्त खलाशी व काही जणांच्या विधवा बॅंकामध्ये खेपा घालत असल्याचं चित्र आहे. काही निवृत्त खलाशी व विधवांनी सरकारकडे कायस स्वरुपी पेन्शन योजनेसाठी मागणी केली आहे. पण सरकारने सहा महिन्यासाठी तयार केलेली योजना एका वर्षासाठी वाढवली आहे.

खलाशी पेन्शनचा मुद्दा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Assembly Election) महत्वाचा ठरला. खास करुन वेळ्ळी, कुंकळ्ळी, बाणावली मतदारसंघात काँग्रेसने कायमस्वरुपी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT