Guirim Fire Dainik Gomantak
गोवा

Goa : गिरीत अग्नितांडव; स्क्रॅपयार्डला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

मुंबई गोवा महामार्गावर गिरी परिसरात रस्त्याशेजारीच असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. या घटनेत अंदाजे दीड लाखांचं नुकसान झालं आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fire : गिरी म्हापसा येथे बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई गोवा महामार्गावर गिरी परिसरात रस्त्याशेजारीच असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. या घटनेत अंदाजे दीड लाखांचं नुकसान झालं आहे. तर काही सामान आगीपासून वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र आग विझेपर्यंत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याशेजारीच असलेल्या गिरीमधील एका भंगाराच्या अड्ड्यावर बुधवारी सकाळी आग लागली. आग लागल्याची माहिती लगेच म्हापसा अग्निशमन दलाला देण्यात आली. म्हापसा अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह पर्वरीमधूनही एक गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या आसपास ही आग लागल्याची माहिती आहे.

गिरी पेट्रोल पंपाजवळच असलेलं हे स्क्रॅपयार्ड मोहम्मद शमीम यांच्या मालकीचं आहे. या आगीत दीड लाखांचं सामान जळाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर सुमारे 5 लाखांचा माल आगीच्या तडाख्यातून वाचवण्यात यश आलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे आसपासच्या आस्थापनांना त्याची झळ पोहोचली नाही. म्हापसा आणि पर्वरीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT