Schools in Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आजपासून शाळेची घंटा वाजणार

सावधगिरीची सूचना : कोविड नियम पालनाचे शाळांसमोर आव्हान

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड महामारीनंतर शाळांवर विविध प्रकारचे निर्बंध आले होते. आता दोन वर्षानंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने शाळांमध्ये किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. सोमवारपासून 2022 -23 या शैक्षणिक वर्षाला

नियमितपणे सुरवात होत असली तरी कोविडचे संकट घोंघावत आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने पालकांच्या मनात भीती कायम आहे. पण सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सक्तीने पालन करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनांनी केली आहे.

(School starts in Goa from today)

मार्च 2020 मध्ये देशात कोविड-19 मुळे शाळा बंद करून शिक्षण ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरू ठेवले होते. परंतु, कोविड नियंत्रणात आल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. आता इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्‍याने वाढू लागल्याने गोव्यातही सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. कोरोना नियमावलीचा पालन करण्याची सूचना आरोग्य खात्याने केली आहे.

वाहतूक कोंडीवर चर्चा : शाळेचा सुरू होत असल्याने कुजीरा शिक्षण संकुलात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत होते. त्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी वाहतूक व्यवस्थापनावर चर्चा केली. पोलिसांशी बोलून बॅरिकेड लावण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचे होणार स्वागत : राज्यातील शाळांमध्ये बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज असून, अनेक शाळांनी वर्ग खोल्यांची रंगरंगोटी केली. कोरोनामुळे अनेक शाळांमध्ये साफसफाई, वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. काही शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत होणार आहे.

उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत. पुढील 15 दिवस लक्ष ठेवून कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या धोरणाविषयी निर्णये घेतला जाईल. सध्या कोणतेही प्रतिबंध लागू केलेले नाही. मात्र, विद्यार्थ्यांसह पालकांनी काळजी घ्यावी.

- डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

नियमावलीचे सक्तीने पालन केले जाईल. संपूर्ण शाळा संकुल सॅनिटायझर केले आहे. शिक्षकांना अगोदर निर्देश देण्यात आले आहे. शाळेत मास्क परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मास्क नसल्यास ते देण्यात येईल. सोमवारी शाळा सकाळी १०.३० वा. सुटणार आहे. विद्यार्थी मिसळू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. - अपर्णा चारी, मुख्याध्यापिका, मुष्टीफंड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT