School Closed

 

Dainik Gomantak

गोवा

'फक्त लसीकरणासाठीच मुलांना शाळेत बोलावता येणार'

गोवा शिक्षण विभागाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश, परिपत्रक जारी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सातवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 26 जानेवारीपर्यंत बंद (School Closed) ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. याबाबत एक परिपत्रकच शिक्षण विभागाने जारी केलं आहे, ज्यात 12 पर्यंतचे वर्ग तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ऑनलाईन स्वरुपात वर्ग सुरुच राहणार आहेत.

शाळा (School) जरी बंद असल्या तरीही 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे. या नियमांचं पालन करण्याच्या सूचना शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सरकारी आदेशामुळे शाळेत मुलांना फक्त लसीकरणासाठीच (Vaccination) बोलावता येणार आहे.

दरम्यान शाळा बंद करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती. तज्ज्ञ समितीनेही तशी शिफारस सरकारकडे केली होती. अखेर परिपत्रक काढत सरकारने (Goa Government) त्यासंबंधी आदेश जारी केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Srinivas Kulkarni Death: मराठी साहित्यविश्वातील 'डोह' निमूटपणे विझला; श्रीनिवास कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Pakistan Army: 'पाकिस्तानी लष्कर दहशतवादी संघटनेसारखं...', पत्रकाराचा दावा; आसिम मुनीरबाबत माजी लष्करप्रमुखाची 'ती' चेतावणी ठरली खरी

IRCTC Beta Website: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 'आयआरसीटीसी'ची नवी वेबसाइट झाली अधिक स्मार्ट, तिकीट बुकिंग होणार झटपट

Lucky Zodiac Signs 2026: 12 ऑगस्टपासून संपणार आर्थिक चिंता! पगारवाढ अन् प्रमोशनचा योग; गुरु ग्रहाचा उदय 'या' राशीला करणार मालामाल

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

SCROLL FOR NEXT