School Roof Collapsed  Dainik Gomantak
गोवा

Roof Collapses At Quepem: मोठा अनर्थ टळला! शाळेचे छत उडून कोसळले आवारात; सुदैवाने कोणासही इजा नाही

Quepem School Roof Collapses: दुपारी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सहा वर्षांपूर्वी इमारतीवर घातलेल्या पत्र्यांच्या शेडचा काही भाग उडून शाळेच्या प्रांगणात कोसळला

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem School Roof Incident

केपे: शाळेत वर्ग सुरू असताना इमारतीवरील छत उडाल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने शाळा सुटण्यास अवघी काही मिनिटे बाकी असताना उडालेले छत शाळेच्या आवारात कोसळल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आंबावली-केपे येथील सरकारी शाळेत घडली.

दुपारी अचानक जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सहा वर्षांपूर्वी इमारतीवर घातलेल्या पत्र्यांच्या शेडचा काही भाग उडून शाळेच्या प्रांगणात कोसळला. त्यामुळे वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना इजा झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर आणि मामलेदार नाथन आल्मेदा यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक काही काळ भांबावून गेले.

छप्पर उखडून पडले त्या वर्गात फक्त खास वर्ग घेतले जात होते, असे मुख्याध्यापिका ज्योती देसाई यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी कारेकर यांनी शिक्षण खात्याला याविषयी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले.

मोठा अनर्थ टळला; सरपंच

या शाळेत बहुतांश अनुसूचित जमातीचे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकारने घ्यावी असे सरपंच देविदास देईकर यांनी सांगितले. ही घटना शाळा सुटण्याच्या काही मिनिटाच्या अगोदर घडल्याने मोठा अनर्थ टळला असे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT