Scandal in goa congress attack on BJP government

 

Dainik Gomantak

गोवा

मंत्र्याचे ‘सेक्स स्कॅंडल’ प्रकरण राज्यपालांकडे,काँग्रेस आक्रमक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्याकडून महिला अत्याचार आणि सेक्स स्कँडलचा विषय जोरदार चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात गाजत असलेल्या मंत्री ‘सेक्स स्कॅंडल’ प्रकरणातील मंत्र्याचे नाव राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) यांना सांगितले असून आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री (Pramod Sawant) आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या संबंधित मंत्र्याचे नाव त्यांच्याकडून घ्यावे, असे ट्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केल्याने राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.(Scandal in goa congress attack on BJP government)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्र्याकडून महिला अत्याचार आणि सेक्स स्कँडलचा विषय जोरदार चर्चेत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपच्या मंत्र्याने महिलेवर अत्याचार करून सेक्स स्कँडल घडविल्याचे जाहीर आरोप केल्याने खळबळ माजली होती. राज्यपाल प्रशासकीय आणि मंत्रिमंडळाच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, ते मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन आणि सूचना करू शकतात. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील संबंधित महिलेने तक्रार करावी असे अगोदरच म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात कारवाईची अपेक्षा कमी आहे. मात्र, काँग्रेस हे प्रकरण किती लावून धरते यावर सर्व अवलंबून आहे.

गिरीश चोडणकर आज नाव जाहीर करणार ?

गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा व ‘सेक्स स्कॅंडल’ झाल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्याला उद्या पंधरा दिवस होत असून ते उद्या त्या संबंधित मंत्र्याचे नाव उघड करणार का याची उत्सुकता राज्यभर लागून राहिली आहे. तत्पूर्वी गिरीश यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्या मंत्र्याचे नाव राज्यपालांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT